रूची सोया इंडस्ट्रीज लिमिटेड पतंजली कंपनी व कामगार काँग्रेसच्या युनियन च्या वतीने वेतनवाढ करार संपन्न.
1 मे कामगार दिनी वेतन वाढ करार भेट
रसायनी प्रतिनिधी:
औद्योगिक क्षेत्रातील खाद्य तेल निर्माण करणारी रूची सोया
इंडस्ट्रीज लिमिटेड पतंजली कंपनी कामगार काँग्रेसच्या नेतृत्वाखाली वेतनवाढ करार संपन्न झाला.
या करारात कामगारांसाठी कामगारांच्या विविध मागण्या कंपनी व्यवस्थापनाने मान्य केल्या असून कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तीन वर्षासाठी झालेल्या या वेतनवाढ करारात कामगारांना 9000 रुपये इतका वेतनवाढ करार करण्यात आला.
शिवाय कामगारांच्या फॅमिली मेडिक्लेम पॉलिसी, बोनस, अपघाती मदत देण्यात आली असून कामगारांसाठी कॅन्टीन ची सुविधाही देण्यात आली आहे. या वेतनवाढ कराराला कंपनी व्यवस्थापनाचे चीफ
ऑपरेटिंग ऑफिसर संजीव खन्ना, एच आर कार्पोरेट शुभ्रा बोस युनिट हेड संजय भनोत, प्लांट एच
आर हेड सुहास गुडाळे उपस्थित होते. कामगार काँग्रेसचे
जनरल सेक्रेटरी सुबिन बाबु थॉमस यांच्या नेतृत्वाखाली कामगार प्रतिनिधी किरण देवघरे. राजन गावडे, उमेश देवघरे, अशोक पिंगळे, बाळाराम पाटील वेंकटेश कुंभार, आदी उपस्थित होते. वेतनवाढ करारावर यावेळी कामगार प्रतिनिधी व कंपनी व्यवस्थापनाचे अधिकारी वर्गाने करार नाम्या वर सह्या केल्या.