खालापूर तालुक्यातील खालापूर तालुक्यातील  सहजसेवा  फाउंडेशन संस्थेचा  गौरव व सन्मान  राज्यपालांच्या हस्ते

प्रतिनिधी खोपोली :-
सहजसेवा फाउंडेशन सामाजिक कार्यात अग्रेसर असते.सातत्यपूर्ण उपक्रम ही सहजसेवेची ओळख आहे तर सामाजिक उपक्रमातुन नवनवीन जागतिक रेकॉर्ड ही संस्थेची उपलब्धी आहे.
दिनांक 19 डिसेंबर 2021 रोजी वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी सुरू केलेली शाळा ही वंचित व उपेक्षित घटकांच्या मुलांसाठी वरदान ठरत आहे.झाडाखाली भरलेल्या शाळेला खऱ्या खुऱ्या शाळेचे रूप आलेले आहे. समाजातील अनेक दानशूर व्यक्ती व संस्था या शाळेसाठी भरीव योगदान देत आहेत.
    26 जानेवारी 2022 रोजी वीटभट्टी कामगारांच्या सहज निसर्ग शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.टाटा स्टील लिमिटेडचे आस्थापण प्रमुख कपील मोदी व खालापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांच्याहस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.या उपक्रमाची जागतिक उपक्रम म्हणून नोंद झालेली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते  राजभवन, मुंबई येथे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी राज्यपाल यांनी संस्थेच्या सहज अन्नसेवा, सहज मनोरुग्ण स्वच्छता, सहज स्वर्गरथ, सहज वैद्यकिय उपकरणे, सहज स्वर्गपेटी,सहज सामुदायिक विवाह,सहज आपत्कालीन मदत व विविध कार्याची माहिती घेऊन उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.यावेळी राजभवन येथे सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, सहज निसर्ग शाळेत शिक्षकरुपात सातत्यपूर्ण योगदान देणाऱ्या उपाध्यक्षा इशिका शेलार, कार्यवाह बी. निरंजन, संघटक अखिलेश पाटील,जयश्री भागेकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी रसायनी येथील कराडे खुर्दचे माजी सरपंच विजय मुरकुटे,नवी मुंबई येथील नीरज पंत उपस्थित होते.या उपक्रमात व्हिजन फ्रेश यांनी सह आयोजकाची भूमिका बजावली आहे.
वंचित व उपेक्षित घटकांना सहजसेवा फाउंडेशन सातत्यपूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न करीत असते. लोकसहभागातून उपक्रम राबविणाऱ्या संस्थेच्या मदत कार्यात भरीव योगदान देणाऱ्यांना हा पुरस्कार अर्पण केल्याची भावना संस्थेच्या कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी यांनी व्यक्त केली आहे.
Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.