खारघर येथे स्वछता मोहिमेचे आयोजन

पनवेल :
पालिका प्रशासनावर स्वच्छतेच्या बाबतीत अवलंबून न राहता पनवेल महानगरपालिकेचे स्वच्छता दूत त्यांच्यासोबत स्वयंस्फूर्तीने माझ्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या सभासदांच्या सोबत इश फाउंडेशन,झिरो फाउंडेशन ,युवा फाउंडेशन,सुमन साळी महिला व बाल विकास संस्था,अक्षरवेल ज्योती फाउंडेशन,लायन्स क्लब ऑफ कामोठे,पंजाबी कल्चर अँड वेल्फेअर असोसिएशन, लक्ष्यपूर्ती वेलफेअर फेडरेशन या सर्व सामाजिक संस्था आणि त्यांचे सदस्य तसेच खारघर मधील नागरिकांनी स्वछता मोहिमेचे आयोजन केले होते.
पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासून नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत पालिका प्रशासनावर अवलंबून न राहता सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन हा सुरू केलेला उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे या स्वच्छता मोहिमेच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांच्या सोबत त्यांच्या संस्थेच्या सभासदांनी सुद्धा श्रमदान केले.
या स्वच्छता मोहिमेसारखी विविध सामाजिक उपक्रम इतर सामाजिक संस्थांनी सुद्धा पुढाकार घेऊन राबवावे. जेणेकरून आपले पनवेल महानगरपालिका क्षेत्र स्वच्छ आणि आरोग्यमय होईल असे मत विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी मांडले.
