महिलांची संस्था इनरव्हील आँफ खोपोलीच्या अध्यक्षपदी सारिका धोत्रे
प्रतिनिधी :-
महिला सक्षमीकरणासह विविध उपक्रम राबविण्यासाठी खोपोलीतील इतर सामाजिक संस्था, रोटरी क्लब खोपोली, लायन्स क्लब, इंट्रॅक्ट क्लब आणि नगरपालिका यांचे सहकार्य घेत सरकारी योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणावर प्रोजेक्ट करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्षा धोत्रे यांची अपेक्षा आहे.
इनरव्हील क्लब दरवर्षीप्रमाणे नवीन अध्यक्ष निवडून काम करण्याची प्रथा कायम ठेवते मागील वर्षाच्या अध्यक्षा सुचिता जोशी यांच्या पदाचा कार्यकाल संपल्यावर सन २०२२-२३ या वर्षासाठी सारिका धोत्रे यांची एकमताने रोटरी क्लबच्या सभागृहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित निवड करण्यात आली.
पदग्रहण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या माहेरवाशीण संघटनेच्या प्रभा शिर्के,खालापूर नगरपंचायतीच्या मा.नगराध्यक्षा तथा विद्यामान नगरसेविका शिवानी जंगम, इनरव्हील स्थापनेपासूनच्या सदस्या कुंदा ताई कुलकर्णी, शांतीताई जोशी, अलकाताई साखरे, माजी अध्यक्षा सुचिता जोशी डॉ .रश्मी टिळक, खजिदर जयश्री क्लोशी मिनील चौधरी सेक्रेटरी श्रीदेवी राव आदि उपस्थित होत्या.
मा.अध्यक्षा सुचेता जोशी यांनी मागील वर्षात केलेल्या कामांची माहिती दिल्यावर नवनिर्चित अध्यक्षपदाचा सारिका धोत्रे यांनी पदभार स्विकारला असून व्हाईस प्रेसिडेंट- श्रीदेवी राव, मा.अध्यक्षा सुचेता जोशी, सचिव जयश्री कलोशी, खजिनदार वैशाली गांधी, आयएसओ – मधुमिता पाटील पत्रकार दिना शहा सीसी विनया हर्डीकर सदस्य-अनिषा बिवरे,सपना चौधरी, जयश्री दोडिया, प्रीती शह, एकता भादोरिया यांची नियुक्ति करण्यात आली आहे.