सार्थ इन्फ्रा टेक्नोसोल्युशन प्रा . लि कंपनीचा वर्धापन दिन …

प्रतिनिधी :- खोपोली

रायगड जिल्ह्यातील यशस्वी उद्योग समुह सार्थ इन्फ्रा टेक्नोसोल्युशन प्रा . लि कंपनी  . शून्यातून विश्व निर्माण करणारा  मराठी तरुण  उद्योजक हरीश काळे  त्यांच्या खोपोली शहरातील  कार्यालयात वर्धापन दिन दरवर्षी प्रमाणे कंपनी व्यवस्थापक मंडळ व मित्र परिवार यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला.

कोरोना चे नियम पाळुन साध्या पद्धतीने तसेच सामाजिक उपदेश जावं या हेतूने वृषरोपन ,पूजा करून साजरा करण्यात आला .
या  निमित्ताने  वर्षातून एक स्नेह भेट उद्योगात काम करणाऱ्या व आपल्या लोकांच्या मधील  विश्वास प्रेम वाढतो आणि प्रेरणा दायी ठरते असे मला उद्योजक म्हणून वाटते  असे म्हणत हरीश काळे यांनी उपस्थित मान्य वरांचे आभार मानले .  कंपनीच्या कर्मचार्यासमवेत धार्मिक आस्थे नुसार सत्यनारायण पुजा अर्चना करण्यात आली. आणि देशावरील सर्व रोग राई व आर्थिक  संकट दूर हो म्हणून प्रार्थना करण्यात आली.

कार्यालय आवारात मोकळ्या ठिकाणी नियोजन करून खोपोली नगरपरिषद चे मुख्याधिकारी अनुप दुरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती त्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपन कार्यक्रम करण्यात आले .
कंपनीचे प्रमुख व्यवस्थापक हरीशजी काळे व मित्र परिवार , मान्यवर निलेशजी देशमुख व सहकारी , कर्मचारी वर्ग या कार्यक्रमात उपस्थित होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.