अभ्यासू समाजसेवक आदम धानुरे यांची पक्ष श्रेष्टी च्या आदेशाने तळोजा फेज 2 राष्ट्रवादी काँग्रेस शहरअध्यक्ष पदी नियुक्ती
प्रतिनिधी तळोजा:- राष्ट्रवादी काँग्रेस तळोजा विभागीय कार्यालयात पक्षश्रेष्ठीच्या व पक्षाच्या ध्येयधोरणाला विचारांना प्रभावित होऊन असंख्य तरुणांनि आदम धानुरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा चा झेंडा हाती घेतला व घोषणा देत पक्ष संघटनेचा अधिकृत सदस्य पद स्वीकारलं केला.

या पक्ष प्रवेशाच्या प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत अनेक नागरी सुविधा बाबत असलेल्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
नेहमी संघर्ष करणारे जनसामान्यात आपला माणूस म्हणून ओळखले जाणारे आदम भाई यांचा देशाचे नेते शरद चंद्रजी पवार यांच्या कार्यपद्धतीवर खूप विश्वास आहे. तळोजा तील उच्च शिक्षित अभ्यासू वृत्ती चे आदम धानुरे यांना पक्ष श्रेष्टी च्या आदेशाने तळोजा फेज 2 शहरअध्यक्ष पदाची जबाबदारी अध्यक्ष रोशन विजय आंग्रे यांनी प्रदेश सचिव संदीप म्हात्रे यांच्या हस्ते अधिकृत नियुक्ती पत्र देऊन केली .

पक्षाचे ध्येयधोरण संघटनात्मक घटने नुसार राजकीय कार्य करून लोक सेवा करण्याचे विविध कामे त्यांच्या हातून घडेल असा विश्वास ठेवून पक्षश्रेष्ठींनी आदम धानूरे यांना जबाबदारी दिली असल्याचे रोशन आंग्रे यांनी सांगितले.
आदम धानूरे यांनी सर्व पक्षश्रेष्ठींच आभार मानत मला पक्षांनी दिलेल्या जबाबदारीचे कार्य राजकीय दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनात्मक कसा वाढेल यासाठी मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत शक्य ती मेहनत घेईन व माझ्यावर केलेल्या विश्वासास पात्र ठरेल. त्यासाठी पक्षाचा प्रचार-प्रसार कसा होईल या दृष्टिकोनातून राजकीय कार्य करून येणाऱ्या आगामी निवडणुकीत महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी कसे निवडून जातील याबाबत प्रयत्न करेन व माझ्यावर ठेवलेला विश्वास व दिलेली पदाची जबाबदारी मी पूर्ण पणे यशस्वीरित्या पार पाडेल असे मी या ठिकाणी आश्वासित करत असल्याचे आदम भाई यांनी सांगितले.

या वेळी शुभम रावत,अफ्फान पटेल,अदनान पटेल, नईम खान, गुलाम गौस नसीम अन्सारी वसीम अन्सारी,धीरज पाटील, रणजित राजपूत आदी सह अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार घोषणा देत प्रवेश केला.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव संदीप म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राजवन, पनवेल युवक शहर कार्याध्यक्ष मंगेश नेरुळकर, पनवेल विधानसभा अध्यक्ष सुनील देबरे, तळोजा विभाग अध्यक्ष रोशन अंग्रे, जिल्हा सचिव कुंडलिक नेटके ,तळोजा विभागिय उपाध्यक्ष अतुल दवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनात्मक पारिवारिक सामाजिक बांधिलकी जपत पनवेल शहर जिल्हा युवक राष्ट्रवादी कांग्रेस उपाध्यक्ष प्रभाकर फडके यांचा वाढदिवस सर्व उपस्थित पक्ष संघटनांनी मिळून साजरा केला व त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.