एकविरा गडावर कलम १४४ लागू.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पण भाविकांना बंदी नाही ?
प्रतिनिधी
(दिपक कांबळे)
लोणावळा : एकविरा गडावर ७ ते १० एप्रिल यादरम्यान चैत्री यात्रा पार पडणार आहे. त्याअनुषंगाने पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुखांनी एक आदेश काढला आहे. यात्रेदरम्यान या भागात कलम १४४ अर्थात जमावबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळं दर्शनासाठी एकविरा गडावर जावं की नाही, असा संभ्रम भाविकांमध्ये निर्माण झाला आहे. पण कलम १४४ नुसार भाविकांना बंदी नसल्याचं प्रशासनानं सांगितले आहे. एकीकडे सर्व निर्बंध हटवले जात असताना या वर्षी भक्ताना आईला भेटण्याचो ओढ लागली आहे गेले दोन वर्ष भक्तांना येत्रेला येण्या साठी प्रशासनाने बंदी घातली होती तेव्हा आता जिल्हाधिकाऱ्यांना काढलेल्या आदेशावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.