स्पोर्ट्स फिजिकल फिटनेस ऑफ बोर्ड उत्तर प्रदेश व इंडिया यूनिव्हर्सिटी यांच्या वतीने उत्तर प्रदेश आगरा येथे १३ व १४ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून ८५ किलो वजनी गटातील स्पर्धेसाठी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा पैलवान व सी के टी कॉलेजचे क्रीडा शिक्षक रूपेश पावशे यांची स्पर्धक म्हणून निवड झाली आहे. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.