पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते व विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन…

पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते व विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रा. पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना चार दिवसांपूर्वी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खास वैद्यकीय पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून होते.
प्रा. पाटील गेल्या दोन वर्षांपासून घरीच होते. प्रा. एन. डी. पाटील यांचे पूर्ण नाव नारायण ज्ञानदे पाटील असे होते. मात्र, एन.डी. या नावाने संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखत होता. कष्टकरी, वंचित, कामगार, मोलकरणी अशा सर्वांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांचा जन्म ढवळी (नागाव जि.सांगली) येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात झाला होता.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.