शेकाप आणि जे.एम.म्हात्रे संस्थेतर्फे विक्री केंद्रात ना नफा, ना तोटा तत्वावर मिळणार ..

प्रतिनिधी/ पनवेल
शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम.म्हात्रे संस्थेतर्फे दिवाळीनिमित्त सर्वसामान्य लोकांना खिशाला परवडणाऱ्या दरात ना नफा, ना तोटा या तत्वावर 3 दिवसीय विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. हे केंद्र पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, सेक्टर 9 उलवे येथे सुरू राहणार आहेत.

महागाईने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. दररोज वाढणाऱ्या महागाईवर सामाजिक बांधिलकीतून काही देणे लागतो या भावनेतून जे.एम.म्हात्रे संस्थेचे अध्यक्ष प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी फराळासाठी आवश्यक रवा, साखर, मैदा या वस्तू जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी उपक्रम गेली अनेक वर्ष हाती घेतला आहे.

सर्वसामान्य कुटुंबांना तर एकाच्या पगारावर घर कसे चालवायचे हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यातच दिवाळी हा सण तोंडावर आल्याने नागरिकांना थोडासा दिलासा म्हणून व दिवाळी हा सण आनंदाने साजरा करता यावा या उद्देशाने प्रितम म्हात्रे यांच्या संकल्पनेने दरवर्षीप्रमाणेच शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था “ना नफा ना तोटा ” तत्वावर विक्री केंद्र उभारून नागरिकांना माफक दरात रवा, मैदा, साखर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था “ना नफा ना तोटा या विक्री केंद्रांचे यंदाचे हे सातवे वर्ष आहे. याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नामांकित व उच्च प्रतीचे एकत्रित 136 रु. किमतीचे अर्धा किलो रवा, अर्धा किलो मैदा व एक किलो साखर माफक दर 90 रुपयामध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, खांदा कॉलनी, डी .ए. व्ही. पब्लिक स्कुल, नवीन पनवेल, सेक्टर 9 उलवे येथे दिवाळीनिमित्त ना नफा ना तोटा या तत्वावर विक्री केंद्र उभारण्यात आले आहेत. नागरिकांनी या विक्री केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन मा.विरोधी पक्षनेते तथा जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था अध्यक्ष प्रितम म्हात्रे यांच्या तर्फे करण्यात आलेले आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.