शिव सहकार सेने ने पाणीपट्टी विरोधात केली मागणी
प्रतिनिधी खोपोली :
खोपोली नगर परिषदेने नुकत्याच पाणी पट्टीच्या नोटिसा नागरिकांना पाठवल्या आहेत. नगर पालिकेने नळ पट्टीत वाढवण्याबाबत दै. पुढारीच्या दि. १९ जून २०२२ च्या अंकात जाहिरात प्रसिध्द केली याची गंभीर दखल घेऊन शिव सहकार सेनेचे शहर संघटक हरीश काळे यांनी दि. ७ जुलै रोजी पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अनुप दुरे यांना एक निवेदन पाठवून नळपट्टी वाढीस तीव्र विरोध केला.
गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या आहेत, सर्व उद्योग- व्यवसाय ठप्प झाले आहेत, नागरिक अगोदरच आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत नळपट्टी वाढवणे चुकीचे आहे असे स्पष्ट करून नळपट्टीच्या वाढीस विरोध केला आहे.