हायकोर्टाची शिवसेना दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्याने मोहोपाड्यात शिवसैनिकांचा जल्लोष.
प्रतिनिधी/ साबीर शेख
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात वासांबे मोहोपाडा परिसरातील शिवसैनिकांनी हायकोर्टाने शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना मेळाव्याला परवानगी दिल्याने आनंदोत्सव साजरा करीत फटाक्यांची आतषबाजी करून एकमेकांना पेढे भरविले.
हायकोर्टांने उध्दव ठाकरे यांच्या युक्तिवादाला समर्थंन देताच शिवसैनिकांना आनंद झाला.वासांबे मोहोपाडा परिसरातील शिवसैनिक मोहोपाडा शिवसेना शाखा मध्यवर्ती कार्यालयाबाहेर जमले.
यावेळी शिवसैनिकांनी “शिवसेना जिंदाबाद, उद्धवसाहेब ठाकरे आगे बढो,हम तुम्हारे साथ है”अशी घोषणाबाजी केली.
यावेळी शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले.यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख रमेश पाटील, वासांबे मोहोपाडा विभागप्रमुख अजितदादा सावंत,माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल राऊत,जेष्ठ शिवसैनिक अनंता भोईर,शंकर भोईर,चिक्या भोईर,भाऊ काठावले, सचिन रसाल, राजेश सोले, संतोष जेठे,रुपेश चव्हाण आदीसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
दसरा मेळाव्यासाठी वासांबे मोहोपाडा परिसरातील असंख्य शिवसैनिक शिवाजी पार्कवर जाणार असल्याचे मोहोपाडा शहरप्रमुख संतोष पांगत यांनी सांगितले.