शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब आम्ही सदैव आपल्या सोबत!!
जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत
प्रतिनिधी मुंबई
आज शिवसैनिकानीं शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली.
पनवेल विधानसभा-१८८ मधील शिवसेना पदाधिकारी, महीला आघाडी, युवासेना व युवतीसेना पदाधिकारी यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक शिवसैनिक सदैव सोबत असू असा निर्धार त्यावेळी उपस्थितांनि घोषणा देत केला.
या वेळी शेकडोंच्या संख्येने पनवेल विधानसभा क्षेत्रातील अनेक पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना व युवतीसेना आदी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.