गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेनेचे नेते रामदास शेवाळे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुरु भेट

प्रतिनिधी मुंबई 

गुरुपौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरूंचा दिवस आज अशा दिवशी रामदास शेवाळे यांनी त्यांचे राजकीय गुरु व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री  गुरुवर्य  एकनाथजी शिंदे  यांची भेट घेतली
गुरूं चरणी जाऊन सर्व शिवसैनिकांनी भेट व आशीर्वाद घेतले. आज प्रत्यक्षात एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने आम्हाला आमच्या राजकीय गुरू च्या रुपात सर्व महाराष्ट्राला पालकत्व मिळाले आहे याचा  समाधान वाटतो.

आज आमच्या सर्व शिवसैनिकांना शिंदे साहेबांना भेटून नवीन ऊर्जा व प्रेरणा ,आशीर्वादाने आमच्या सर्वांचे मन तृप्त झाले असल्याचे मत शिवसेना नेते रामदास शेवाळ यांनी व्यक्त केले .

ह्यावेळी त्यांच्यासोबत अनेक शिवसैनिक उपस्थित होते. साहेबांना श्री रामदास शेवाळे प्रतिष्ठान व मित्र परिवारा कडून राज्यातील विकासासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना आपल्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र व आम्ही सर्व शिवसैनिक आहोत असे बोलून सर्व शिवसैनिकांनी भावनिक नजरेने आनंद अश्रू सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.