पाणी टंचाई सोडवण्यासाठी शिवसेनेने सिडकोच्या उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली
प्रतिनिधि/ प्रेरणा गावंड
शिवसेना उपशहरप्रमुख मंगेश रानवडे यांनी मुख्य अभियंता आर.बी. धायतकर यांना पत्र लिहून खारघर सेक्टर ३४-३६ भागातील पाण्याचे संकट तातडीने सोडवण्याची विनंती केली होती. त्याची एक प्रत मुख्यमंत्री कार्यालयात पाठविण्यात आली.
खारघर सेक्टर ३४-३६येथील सोसायटीमधील जलसंकटाच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी सिडको कार्यालय कोकण भवन येथे २ ऑगस्ट रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीत सिडको कडून मुख्य अभियंता (एन एम आय ए) आर बी धायतकर व मुख्य अभियंता जल विभाग शमुल,कार्यकारी अभियंता चेतन देवरे उपस्थित होते, तर शिवसेना महानगर प्रमुख श्री रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना खारघर उपशहर प्रमुख मंगेश रानवडे व इम्तियाज शेख यांचे शिष्ट मंडळ उपस्थित होते.
समस्या सोडविण्यासाठी मुख्य अभियंता जल विभाग यांना बाधित सोसायट्यांकडून तपशीलवार विश्लेषण, तारीखवार युनिटनिहाय, इमारतनिहाय दिले होते.
२ तासांहून अधिक काळ सखोल चर्चा झाल्यानंतर बाधित सोसायट्यांमधले पाणी संकट येत्या ७ ते ८ दिवसात सोडवता येईल का याची खात्री करण्यासाठी कृती आकडा तयार करण्यात आलेला आहे.
अधिकारी मूल यांनी सिडकोच्या जल विभागाच्या संबंधित प्रतिनिधींना प्रत्येक सोसायटीमध्ये नियमित बैठक घेऊन नेमक्या समस्या जाणून घेण्याचे आदेश दिले.
विविध सोसायट्यांचे अध्यक्ष व सचिव यांच्यासह शिवसेनेचे शिष्टमंडळ सिडको अधिकाऱ्यांनी त्यांच्या सोसायट्यांमधील पाण्याच्य संदर्भात घेतलेल्या दृष्टिकोनावर समाधान व्यक्त केले.शिष्टमंडळात विविध संस्थेच्या प्रमुखांचा समावेश होता.