शिवसेना पनवेल जिल्हा व रामदास शेवाळे प्रतिष्ठान मार्फत चालक दिन साजरा…

प्रतिनिधी/ साबीर शेख

शिवसेना पनवेल जिल्हा व रामदास शेवाळे प्रतिष्ठान मार्फत ता.17 रोजी बिमा कॉम्प्लेक्स या ठिकाणी चालक दिन साजरा करण्यात आला.

देशातील दळणवळण व परिवहन क्षेत्रातील वाहनचालक हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या याेगदानाबद्दल चालकांचा उचित सन्मान करण्याच्या उद्देशाने 17 सप्टेंबर हा दिवस चालक दिन म्हणून साजरा केला जात जातो त्या अनुषंगाने कळंबोली स्थित आशिया खंडातील सर्वात मोठ्या लोखंड बाजारात माल वाहतूक करण्यास येणार्या वाहन चालकांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून  सत्कार करण्यात आला.

 

शिवसेना पनवेल जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात पनवेलचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन ठोंबरे ,मोटर वाहन निरिक्षक चंद्रकांत माने, संजय पाटील, स्वप्नील नेवसे कळंबोली वाहतूक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकर, पीएसआय साळुंखे उपस्थित होते.

या वेळी आर टी ओ अधिकारी गजानन ठोंबरे यांनी चालकांना मार्गदर्शन केले. तर निशिकांत विश्वकर यांनी वाहतुकच्या नियमांचे पालन कसे करावे या विषयी मार्गदर्शन केले. वाहतुकदार तुकाराम सरक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर रामदास शेवाळे प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्रीकांत फाळके यांनी ऊपस्थितांचे आभर मानले.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.