*जाणीव सामजिक संस्थेच्या वतीने आदिवासी बांधवांना फराळ वाटप आणि खाऊ वाटप कार्यक्रम
प्रतिनिधी पनवेल
जाणीव सामाजिक संस्थेच्या वतीने पनवेल तालुक्यातील वाकडी गावातील दोन आदिवासी वाड्या त्याचबरोबर वांगणी आदिवासीवाडी, छोटी धामणी आणि मोठी धामणी त्याचबरोबर जनाधर्मा आधारगृह या ठिकाणी दिपावली फराळाचं वाटप करण्यात आलं.
आजची महागाई पाहता प्रत्येकालाच सण साजरा करणे शक्य होत नाही.त्या अनुषंगाने जाणीव सामाजिक संस्था विविध उपक्रम राबवून कायम पुढाकार घेत असते.
कधी ब्लँकेट वाटप, कधी कपडे वाटप, आरोग्य शिबिर ,कधी शाळांमध्ये वह्या वाटप, वृक्ष लागवड असे विविध उपक्रम जाणीव च्या वतीने राबवत असतात .
समाजाप्रती आपलंही काही देणं आहे या भावनेने जाणीव सामाजिक संस्था काम करत असते
या उपक्रमाला जाणीव सामाजिक संस्थेचे राजेश केणी , खजिनदार संदीपजी यादव ,सुभाषजी भोपी(सर), सुरेशजी कडव, मारुती भस्मा, संतोषजी यादव, राजेशजी चव्हाण, किरण जाधव, राजेश, ज्ञानेश्वर पाटील, डिके भोपी, रवींद्र चौधरी, बरीचशी चिमुरडी मंडळी , त्या वाड्या मधील स्थानिक उपस्थीत होते.