*भव्यदिव्य पनवेल प्रीमियर लीग च्या आयोजनातून होणार पनवेल मधील दुर्गम भागात समाजसेवा*

प्रतिनिधी\दीपक कांबळे

पनवेल : पनवेल समालोचक असोशियनच्या माध्यमातून खारघर मध्ये सुरु झाला आहे पनवेल प्रीमियर लीग चा धुमाकूळ ! या सामन्यासाठी पनवेल मधील ग्रामीण भागातून चांगल्या खेळाडूची निवड करून पनवेल प्रीमियर लीग मध्ये संधी दिली जाते. पनवेल समालोचक असोशियन च्या माध्यमातून हे आयोजन करण्यात येत असून हे लीगचे दुसरे वर्ष आहे. लीग ची सुरवात खारघर मधील सेक्टर २७ पेठपाडा मैदान इथे होणार आहे.

या सामन्यात प्रथम पारितोषिक ४,४४,४४४ तर द्वितीय पारितोषिक २,२२,२२२ व तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक १,११,१११ असे आहे. मालिकावीर साठी मोटरसायकल व उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज यांना सायकल देण्यात येणार आहे. या लीगचे थेट प्रक्षेपण यु ट्यूब ( PTC Live) च्या माध्यमातून होणार आहे. मुख्य बाब म्हणझे या लीग साठी पनवेल मधील कान्हा कोपऱ्यातून क्रिकेटचे चहाते क्रिकेट पाहण्यासाठी येतात. या लीग च्या नफ्यातून आयोजक (पनवेल समालोचक असोसिएशन) गेले चार वर्ष सातत्याने समाजसेवा करत आहे . या नफ्यातून गरजू लोकांच्या मुलांना शाळेची बॅग, वह्या, पुस्तके, छत्री, क्रीडाचेे साहित्य तसेच आदिवासी भागात जीवन आवश्यक घरगुती वस्तू वाटप होते अशी माहिती पनवेल समालोचक असोशियनचेे सहखजिनदार प्रवीण टेंबे यांनी दिली. पनवेल असोसिएशनच्या माध्यमातून सलग चौथे वर्ष हे समाजसेवा होत आहे. धामोळे शिरवली मोरावे वावंजे अशा भागातील गरजू लोकांना पनवेल समलोचक असोसिएशनच्या माध्यमातून समजसेवा करण्यातआली . एक चांगले विचार आणि एक चांगले आयोजन घेऊन याही वर्षी लीगच्या माध्यमातून क्रिकेटचे सामने पनवेलकरांना बघायला मिळणार आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.