कोकण डायरी या सुप्रसिद्ध मराठी वृत्तपत्राचे संपादक जेष्ठ पत्रकार सय्यद अकबर यांना संविधान,शहीदगाथा हे पुस्तकं देऊन सन्मानित करण्यात आले.
सैनिक हो तुमच्यासाठी” म्हणजेच आजी माजी सैनिकांसाठी भारतभर काम करणारी संस्था “जयहिंद फाउंडेशन”
प्रतिनिधी :-(साबीर शेख)
जय हिंद फाउंडेशन देशातील लष्कर सेवा दलातील सैनिक व त्यांच्या कुटुंबाला विशेष सहकार्य देणारी संस्था आपल्या प्रत्येक भारतीयाला देशामध्ये या सुखसोई स्वातंत्र्य मिळतं ते स्वातंत्र्य सीमेवर लढणाऱ्या प्रत्येक सैनिकांमुळे शक्य आहे.
दुर्दैवाने अशा सैनिकांवर आलेले अनेक संकटे यावर भारत सरकारच्या सहकार्य नंतर त्यांना साथ देण्याची आपण सर्व भारतीय यांची जबाबदारी असावी म्हणून जय हिंद फाउंडेशन जनजागृती करते.

देशातील प्रत्येक राज्यात जाऊन सैनिकांच्या पारिवारिक सर्व गरजा पुरवण्याचे काम जय हिंद फाउंडेशन च्या माध्यमातून होत राहते.
खारघर येथे संस्थेचे अध्यक्ष उद्योजक संदीप माने यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळा प्रसंगी जय हिंद फाऊंडेशनने समाजात विशेष कार्य करणाऱ्या अनेक व्यक्तींचा सत्कार व सन्मान केला .
जय हिंद फाउंडेशनच्या या देश अभियानामध्ये आपण सर्वांनी आपलं कर्तव्य म्हणून साथ द्यावी जेणेकरून आपल्याला सुरक्षित ठेवणारे भारतीय सैनिक व त्यांच्या परिवाराला आपल्या सर्व भारतीयांचा अभिमान वाटेल.
समाजामध्ये शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक एक सहकार्य करत सामान्यातून असामान्य काम करणाऱ्या अनेकांचे यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रवक्ता माधव भंडारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले.
त्यातीलच एक म्हणजे सर्व जाती धर्माला समान मानणारे तसेच पत्रकारिता,शैक्षणिक, सामाजिक,राजकीय व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल कोकण डायरी या सुप्रसिद्ध मराठी वृत्तपत्राचे संपादक जेष्ठ पत्रकार सय्यद अकबर यांना ही संविधान,शहीदगाथा हे पुस्तकं देऊन सन्मानित करण्यात आले.
देशातील प्रत्येक भारतीयांनी देशसेवा करण्यासाठी आपल्या शैक्षणिक, बौद्धिक पात्रतेनुसार आप आपल्या क्षेत्रात देश हिता मध्ये उल्लेखनीय काम करू देशसेवा करावी या उद्देशाने जय हिंद फाउंडेशन कार्य करत आहे.
यावेळी जय हिंद फाऊंडेशनचे सचिव हनुमंत मांढरे, उपाध्यक्ष अनिल अनपट, खजिनदार तुषार घोरपडे व आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रम दरम्यान जय हिंद फाउंडेशनला जगे परिवाराकडून दहा हजार रुपये सहकार्य करण्यात आले.
शहीद सैनिक व त्यांच्या कुटुंब कल्याणासाठी सामाजिक कार्य करणारी एकमेव संस्था
जय हिंद फाउंडेशन संस्थेला(नोंदणी क्र. महा/ १७४/२०१७)
आर्थिक सहकार्य करण्यासाठी खालील माहिती-
ॲक्सिस बँक खारघर आय एफ एस सी कोड UTIB0004721
jaihind foundation
Ac.no. 922010006131478