रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी सोमनाथ घार्गे

विशेष वृत्त अलिबाग: जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीचे आदेश शुक्रवारी रात्री गृह विभागाकडून बजावण्यात आले. सोमनाथचे रायगडचे मावळते अधीक्षक अशोक दुधे यांची नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसापासून रखडलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना घार्गे यांच्या नियुक्तीने मुहूर्त मिळाला आहे मात्र एकत्रित आदेश बजावण्याऐवजी स्वतंत्रपणे केल्या जात असलेल्या आदेशाबद्दल पोलीस वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उर्वरित वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्या कधी होतील याकडे सर्वांची उत्सुकता लागून राहिली आहे.


सोमनाथ घार्गे शनिवार पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले.अशोक दुधे गेल्या दोन वर्षापासून रायगड पोलीस अधीक्षक पदी कार्यरत होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.