जागतिक महिला दिन सप्ताह च्या निमित्ताने स्पॅन महिला ऍग्रो टुरिझम महिला विकास संस्था अध्यक्षा सुलताना चांदबिबी वंशज अनिसा शेख यांच्या हस्ते चिपळूण शाखेचे उद्घाटन
प्रतिनिधी /चिपळूण
१० मार्च रोजी शासनाचे ध्येय धोरण व त्यात महिलांचा वाटा ,स्वयंरोजगार योजना, लघुउद्योग इत्यादींवर सिद्धी इंग्लिश स्कूल शिगवण महाराज मठ शिरगाव येथे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
पर्यावरण ,वनस्पती संगोपन संशोधन व स्वयंरोजगार देणारी संस्था .
संपूर्ण महाराष्ट्रात ११ शाखा व ९००० महिलांच्या संघटनास स्वयंरोजगार देणाऱ्या संस्थाच्या माध्यमातून विविध लघुउद्योग निर्माण करणारी माऊली म्हणजे समाजसेविका अनिसा शेख
आत्मनिर्भर सक्षम जीवनासाठी व रोजगार विषयी मार्गदर्शन करताना त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांद्वारे आपल्या संस्थेला जोडून लघुउद्योग करताना लागवड, संवर्धन ,संगोपन महत्व पठवत वेगवेगळ्या रोजगारासाठी नियोजन व पर्यटन आभ्यास द्वारे उद्योग महत्त्व कळवले.
उपस्थित मान्यवरांचे त्याच्या महत्व पूर्ण योगदाना बद्दल स्वागत ,सन्मान सत्कार कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी स्पॅन महिला ऍग्रो टुरिझम महिला विकास संस्था अध्यक्षा अनिसा शेख , आरुता अडविलकर मनीषा पवार संध्या साळुंखे व अन्य सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व प्रसार माध्यमे मोठया संख्येने उपस्थित होते.