भारत निवडणूक आयोगाकडून दिनांक ०१ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकानूसार १ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत नविन मतदार नाव नोंदणी करुन मतदार यादी सुधारित करण्याचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
त्याअन्वये जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांचे निर्देशान्वये दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल येथे स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता मतदार नोंदणी शिबीर आयोजित केले होते. सदर शिबीरात प्रमुख मार्गदर्शक म्हणुन स्नेहा उबाळे उपजिल्हानिवडणुक निर्णय अधिकारी उपस्थित होत्या. त्यांनी मतदार नोंदणी , दुरूस्ती, वगळणी, इत्यादिंबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रसंगी पनवेल तहसिलदार विजय तळेकर यांनी उपस्थीत विद्यार्थ्यांस मतदार नोंदणीचे महत्व पटवून देण्यात आले. सदर कार्यक्रमात एकुण ४७ विद्यार्थ्यांची नोंद शिबीरात करण्यात आली.
Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.