शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड-पनवेल  शिरीष घरत  यांचे कामोठे शहराच्या वतीने विशेष आभार आणि धन्यवाद..

पनवेल प्रतिनिधी :-

संपूर्ण कामोठे शहरा मध्ये आणि जास्त करुन सेक्टर १७,१८,३४,३५ आणि ३६ येथे गेल्या २ महिन्यांपासून पाणी प्रश्न खुप भेडसावत आसताना कामोठे नोड च्या आधिकार्याकडून हा प्रश्न सुटत नसल्याने आदरणीय जिल्हाप्रमुख  शिरीष घरत साहेब यांच्या उपस्थितीत आज रायगड भवन येथे पाणी प्रश्नावर जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची अधिकाऱ्यां बरोबर एक तास चर्चा झाली “आम्हास फक्त आश्वासन नको रिजल्ट पाहिजे” आशी ठाम भुमिका जिल्हाप्रमुख शिरीष घरत  यांनी व सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली. या दोनच दिवसांत याचा रिजल्ट दिसून समाधानकारक पाणी कामोठे मधील नागरिकांना मिळेल आशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली.


यावेळी कामोठे विभाग प्रमुख.बबन गोगावले यांच पत्र देण्यात आले.
यासमयी विभाग प्रमुख .बबन गोगावले, उप विभाग प्रमुख श्संजय जंगम, उप विभाग प्रमुख सचिन त्रिमुखे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.