राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा,भारत मुक्ती मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चा आयोजित महापुरुषांच्या/महानायिकांच्या संयुक्त जयंती अंतर्गत राज्यस्तरीय महारैली सम्मेलन दि.२९ मे २०२२ रोजी व्ही.के. हायस्कूल, पनवेल या ठिकाणी संपन्न झाला..

लोकतांत्रिक आजादी चा लढा म्हणून शासक न निवडता स्वतः शासक बना मतदार हाच लोक प्रतिनिधी बनून लोकशाही टिकऊ शकतो,

प्रतिनिधी पनवेल ;(साबीर शेख) : जय मुलनिवासी ..जय संविधान.. जय भारत.. अशा घोषणा देत २५ मे रोजी झालेल्या यशस्वी भारत बंद आंदोलन तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे आपली साथ असल्यास भविष्यात लवकरच आपली सत्ता येईल व देश बदलेल असे बोलून वामन मेश्राम यांनी सभेत  उपस्थितांचे आभार मानले”

राष्ट्रीय परिवर्तन ,भारत मुक्ती व बहुजन क्रांती मोर्चा अंतर्गत राज्यस्तरीय महारॅली सम्मेलन

“मुझे पढे लिखे लोगो ने धोका दिया “असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना म्हणण्याची वेळ का आली यासाठी व बाबासाहेबांची चळवळ पुढे चालवण्यासाठी बामसेफ संघटने सोबत यावे लागेल येत्या दहा वर्षात मतदारांना आपल्या अधिकाराचा हक्काचा भारत घडवायचा असेल तर फक्त एकच पर्याय बामसेफ.
संघटने कडून भारत बंद आंदोलन ज्या ज्या वेळी करण्यात आले . त्या त्या वेळी सत्ताधाऱ्यांनी देशाचे लक्ष बदलण्यासाठी भोंगे, राम, राणा, हनुमान, ज्ञान व्यापी मंदिर असे सर्व विविध मुद्दे प्रसारमाध्यमांवर प्रदर्शित करून देशा तील लोकांना त्यांच्या प्रमुख मुद्द्यापासून वेगळे ठेवले .
आपल्या देशातील पंतप्रधान स्वतः ओबीसी असताना मी ओबीसी जनगणना करणार नाही असा हलफनामा कोर्टात देणे म्हणजे नामधारी प्रतिनिधित्व करून स्वतःला व संपूर्ण ओबीसी समाजाला सत्ताधार्‍यांच्या गुलामी ठेवण्यासाठी च असे मी पुराव्या सोबत बोलेन.

राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा ,भारत मुक्ती मोर्चा ,बहुजन मुक्ती मोर्चा  राज्यस्तरीय महारैली

आपल्याला जर देशात बदल घडवायचा असेल तर बाबासाहेबांच्या विचारांवर चालावे लागेल ज्या ज्या मुद्द्यांवर बाबासाहेबांनी कडवट निंदा केली, त्यावर अभ्यास करून देशाला योग्य दिशा देण्याचे काम राष्ट्रीय परिवर्तन ,भारत मुक्ती ,बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने संपूर्ण भारत भर चालू आहे. आपण सर्वांनी संघटना बांधणीसाठी पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्य पर्यंत पोचून भविष्य येणाऱ्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधित्व सदस्यत्व न करता भारतीय संविधान व ओबीसी, एस सी ,एस टी सारख्या असलेल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र येऊन बामसेफ च्या नेतृत्वाखाली मतदान करावे असे मत अध्यक्ष प्रमुख वक्ते म्हणून वामन मेश्राम (राष्ट्रीय संयोजक,राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा- नवी दिल्ली) यांनी कार्यक्रमात मांडले .

राष्ट्रीय परिवर्तन ,भारत मुक्ती व बहुजन क्रांती मोर्चा आयोजित राज्यस्तरीय महारैली सम्मेलन संपन्न

कोल्हे ,कुत्रे, जनावरांची गिनती झाली पण दुर्दैवाने १०० वर्ष होत आली पण ओबीसींची मोजणी झाली नाही यामागील षड्यंत्र आपल्याला समजावा लागेल.
EVM मशिनमध्ये निवडणुक धोरण , CAA, NRC ची अंमलबजावणी, बेरोजगारी, महागाई, जनतेची उपासमार, धार्मिक उन्माद, शेतकऱ्याची वर्षभरापासून दिशाभूल, देशाचे खाजगीकरण, उदारीकरण करणे, सरकारी कंपन्यांना भांडवलदारांना त्रास द्या, अश्या मुद्द्यावर तीव्र शब्दात भांषणे झाली.
पनवेल येथील सहकारी सदस्य आत्माराम गायकवाड यांनी संघटना निर्माण निधी म्हणून 3 गुंठे जमीन दान केली
राष्ट्रव्यापी जनआंदोलन निधी म्हणून दहा लाख 18 हजार 600 रुपये संघटनेला स्फुर्त करण्यात आले.

राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा ,भारत मुक्ती मोर्चा ,बहुजन मुक्ती मोर्चा राज्यस्तरीय महारैली संपन्न

राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा ,भारत मुक्ती मोर्चा ,बहुजन मुक्ती मोर्चा  व अन्य संघटना तील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते  त्यात मान्यवर के.डी. गोहील महासचिव ,श्रीकांत होवाळ प्रदेशाध्यक्ष बी एम पी ,चंद्रसेन लहाडे प्रदेशाध्यक्ष मौर्य क्रांती संघ, कुंदा तोडकर ,विजय आवस्कर, विजयराज शेंगेकर, मौलाना मोसिन ,हरविंदर सिंह, सुखदेव चव्हाण ,प्रेमराज बोबडे, योगेश थोरात ,प्रशांत हावळे ,बापू भडके ,आताऊल्ला खान, डॉ. संजय दाभार्डे, रवींद्र येळीज, मनोज महाले सह आदी मान्यवर उपस्थित होते.

हजारोच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या सभेत ज्या लोकांना बाबासाहेबांनी विदेशात पाठवले त्या लोकांनी आपल्या स्वार्थापोटी आयुष्य जगले ,बाबासाहेबांची चळवळ पुढे चालवली नाही म्हणून बाबासाहेब बोलले मुझे पढे लिखे लोगो ने धोका दिया आपण सर्वांनी बाबासाहेबांची चळवळ पुढे चालवण्यासाठी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा ,भारत मुक्ती मोर्चा ,बहुजन मुक्ती मोर्चा याला पाठिंबा देऊन नवीन देश घडवण्यासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे नाहीतर हा देश आपल्याला माफ करणार नाही असे आव्हान देऊन वामन मेश्राम यांनी सभेस संबोधिले.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.