आमदारांच्या पेन्शन व घरां विरोधात भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन रायगड न्यासचे निवेदन
पनवेल /वार्ताहर
आमदारांना जाहीर झालेली मुंबईतली घरे रद्द करावी व सध्या मिळणारी पेन्शन देखील बंद होऊन निवृत्त होणाऱ्याना मिळणाऱ्या सवलती प्रमाणे त्यांना सवलती मिळाव्यात अशी मागणी रायगड जिल्हा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

आज पनवेल तहसील कार्यालयात तहसीलदार विजय तळेकर यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष शंकर बगाडे,अलाउद्दीन शेख,पनवेल महानगर प्रमुख किरण बाथम,अरुण पालांडे,नितीन जोशी,संतोष ठाकूर,गणपत वरगडा, साबीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजात वावरताना आमदार, खासदार यांच्या उत्पन्नात झालेली अमर्याद वाढ़,कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधिंचे अनपेक्षित वाढणारे उत्पन्न हे सर्वत्र पहायला मिळते. म्हणजेचे समाजातील वाढलेला भ्रष्टाचार कुणालाच आक्षेपार्ह वाटत नाही. म्हणजेच राजकारणातील अशा घटकांना अशा वाढीव पेन्शनची गरज नाही. त्यामुळे सरकारने या निर्णयाचा पुनर्वीचार करून हा निर्णय रद्द करावा असे मत जिल्हाध्यक्ष बगाडे व अण्णा हजारेंचे विश्वस्त सचिव अलाउद्दीन शेख यांनी केले.