त्याग आणि बलिदानाचा संदेश घेऊन एकता , बंधुभाव आणि मानवतेची शिकवण देणारी ईद उल अजहा
▪️प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करा
▪️गोवंश प्राण्यांची अवैध तस्करी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी
▪️जनावरांची वाहतूकीपुर्वी स्वास्थ्य तपासणी करून प्रमाणपत्र द्यावे
महाराष्ट्र राज्यसरकारच्या बकरी ईद संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे – व.पो.नि. रवींद्र दौंडकर
पनवेल दि.०७ ) : महाराष्ट्र सरकारच्या बकरी ईद संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे असे आवाहन आज पनवेल तालुक्यातील बारापाडा तसेच वावंजे या ठिकाणी घेतलेल्या बैठकीमध्ये पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी केले.
बारापाडा व वावंजे येथे आगामी बकरी ईद उत्सवाच्या अनुषंगाने मस्जिद /मदरसा पदाधिकारी व सदस्य यांची एकत्रितपणे बैठक घेण्यात आली. या बैठकीत व.पो.नि. रवींद्र दौंडकर यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे अंमलदार सचिन होळकर हे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शनपर करताना व.पो.नि. रवींद्र दौंडकर यांनी सांगितले कि, कोरोना विषाणूचा संसर्ग अजून सर्वत्र पसरत असल्याने बकरी ईद हा पवित्र सण साजरा करताना मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, धार्मिक विधी हे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी , टेरेसवर साजरी करू नये, कोरोना विषाणूचा फैलावास प्रतिबंध करणाऱ्या उपायांचा जास्तीत जास्त अवलंब करणे बाबत नागरिकांना सांगणे, सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच महाराष्ट्र सरकारच्या बकरी ईद संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात येणे, बकरी ईद उत्सव सणाच्या अनुषंगाने संबंधितांनी महापालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेणे, आरोग्य विभागाकडून कोविड-19 संसर्गजन्य परिस्थिती सर्वच ठिकाणी मोठ्या संख्येने वाढत असल्याने कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने बकरी ईद उत्सव साजरी करणे अपेक्षित आहे याबाबत आपण आपल्या समाजात जनजागृती करावी इत्यादी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीला मशिद, मदरसा पदाधिकारी, सद्स्य आदी उपस्थित होते.