सुभाष नगर, मस्कॉ कॉलनी, लव्हजी, चिंचवली परिवहन सेवा पुन्हा चालु करावी ….राहुल सखाराम जाधव
प्रतिनिधी २० जुलै २०२२
खोपोली गाव ते वासरंग, मस्कॉ कॉलनी (सुभाष नगर), स्टाफ कॉलनी सर्कल (जगदीश नगर), लव्हजी, चिंचवली पुन्हा खोपोली असा सिटी बस मार्ग पूर्वरत आहे. खोपोली नागरपरिषदे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय सखाराम जाधव यांनी १९८५ साली पहिल्यांदा निवडून आल्या नांतर या मार्गावरील हे सेवा तत्काळ सुरू करून घेतली होती. लॉक डाउन मध्ये सिटी बस सेवा बांद करण्यात आली होती. आता ही सेवा पुन्हा शहरात, लोणावळा व खालापूर तालुक्यात काही मार्गावर सुरू झाली आहे पण अद्याप हया मार्गावर सुरवात झाली नाही. या आधी ही मागणी युवा नेते राहुल जाधव यांनी नागरपरिषदे केली होती.
सुभाष नगर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग, शाळा, कॉलेचे विध्यार्थी, महिला वर्ग या परिवहन सेवेचा वापर करतो. आता येथील (मस्कॉ कॉलनी- जगदिश नगर) जे. सी. एम. एम स्कूल देखील सुरू झाली आहे.
खोपोली शहरातील एकमेव असे स्वामी अय्यप्पा मंदिर सुभाष नगर येथे आहे, तसेच शंकर मंदिर, हनुमान मंदिर, साई बाबा मंदिर, गणेश मंदिर, नुराणी मस्जिद, समाज मंदिर मध्ये विविध धार्मिक उत्सव आणि भंडारा कार्यक्रम या ठिकाणी वर्ष भर चालू असल्याने भाविकांची वर्दळ चालू असते.
मस्कॉ कॉलनी येथे बस स्टॉप आहे परंतु कॉलनी मध्ये आता कोणी रहिवाशी राहत नाहीत. आलेली बस ही येतूनच परत जाते. आपणास विनंती करतो की ही बस जर *सुभाष नगरला जाधव मामांचा घरा परियांत जाधव मामा चौकात* आल्यास त्याचा उपयोग येथील सर्व नागरिकांना नक्कीच होईल. सर्व ग्रामस्थाची देखील हीच मागणी आहे. मुख्याधिकारी यांचा समवेत त्यांचा दालनात परिवहन सेवा (सिटी बस) संधार्भात या आधी ही चर्चा झाली होती.
आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही विनंती भाजपचे युवा नेते सुभाष नगरचे प्रमुख ग्रामस्थ राहुल सखाराम जाधव यांनी आज खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे यांना तसे पत्र देऊन मागणी केली आहॆ.