देहरंग येथे अफस्कॉन कंपनीच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरन..
माजी उपसभापती पंचायत समिती पनवेल राजेश केणी यांच्या प्रयत्नाना यश…
प्रतिनिधी / साबीर शेख 
पनवेल तालुक्यातील देहरंग शाळा अतिशय वाईट परिस्थिती होती.ही माहिती. अफस्कॉन कंपनी प्रशासनातील संदीप यादव यांना दिली .त्यानुसार प्रेरणा ताई, काजोल ताई, अमित आदी शिष्टमंडळाने या शाळेची निवड केल्याचं जाणीव फाउंडेशन खजिनदार संदीप यादव यांनी स्पष्ट केलं.
राजेश केणी यांनी आपल्या कंपनीचे व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.
 माझ्या तालुक्यातील गावासाठी आपण माझ्या शब्दाला मान देऊन 5 लाखापेक्षा जास्त मदत केली ही अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे.आदिवासी बांधव हा गरीब म्हणण्यापेक्षा हा समाज शेती करत असतो ,शेतामध्ये मेहनत करत असतो आणि शेतकरी या नात्याने तो खऱ्या अर्थाने साऱ्या जगाचा पोशिंदा असल्याचं राजेश केनी यांनी म्हटलं.
 या शाळेची सुरक्षित व सुधारलेली परिस्थिती निश्चितपणाने चांगले विद्यार्थी घडवेल असा विश्वास राजेश केणी यांनी व्यक्त केला.
माझा प्रत्येक आदिवासीं बांधव प्रामाणिक आहे, मेहनती आहे. याचा मलाअभिमान असल्याचं राजेश केणी यांनी म्हटल.  विद्यार्थी बांधवांशी संवाद  ही त्यांनी  साधला.
 शेतकरी कामगार पक्ष तालुका चिटणीस राजेश केणी यांनी सुचवल्यामुळे ही शाळा अतीशय उत्तम रित्या अगदी सुधारित झाल्याचे  भुरे सर यांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी  तालुका चिटणीस राजेश केणी अपकॉन्स कंपनीच्या प्रेरणा ताई, काजोल ताई, संदीप यादव, सुभाष भोपी, केंद्र प्रमुख भोईर सर, भुरे सर, संतोष यादव,अमित म्हात्रे, शाळेच्या प्राचार्य खराडे मॅडम, अमोल धोंड सर आणि विद्यार्थी ,पालक उपस्थित होते.
Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.