जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त नेरे येथे मोफत सॅनिटरी पॅड वाटप व मेडिकल चेकअप कॅम्पचे आयोजन

नेरे येथे महिलाना सॅनिटरी पॅड वाटप व मेडिकल चेकअप कॅम्प यशस्वी, मासिक पाळीबाबत महिलामध्ये जनजागृती

नवीन पनवेल : जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त नेरे येथे मोफत सॅनिटरी पॅड वाटप व मेडिकल चेकअप कॅम्पचे आयोजन शनिवार 28 मे रोजी नेरे बस स्टँड, जितू फार्म येथे करण्यात आले होते. यावेळी अलिबागच्या नगरसेविका चित्रलेखा पाटील, ममता प्रीतम म्हात्रे, राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर, जिल्हा परिषद सदस्य रेश्मा शेळके, नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे, माजी सरपंच कांता विलास फडके, रंजना सड़ोलीकर, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश पाटील, तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर, जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, दर्शन ठाकूर यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे आयोजन हर्षला योगेश तांबोळी यांनी केले होते.

नेरे येथे महिलांना सॅनिटरी पॅड वाटप व मेडिकल चेकअप कॅम्प , मासिक पाळीबाबत महिलामध्ये जनजागृती

‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस दरवर्षी 28 मे रोजी साजरा केला जातो. मासिक पाळीच्या काळात महिलांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे हा यामागचा उद्देश आहे. खेड्यापाड्यात आणि शहरांमध्ये गरीब वस्तीत राहणाऱ्या लाखो स्त्रिया आजही यासंबंधीच्या महत्त्वाच्या माहितीपासून अनभिज्ञ आहेत. या पार्श्वभूमीवर हर्षला योगेश तांबोळी यांनी पुढाकार घेऊन नेरे येथे सॅनिटरी पॅड वाटप व मेडिकल चेकअप कॅम्पचे आयोजन केले. यावेली चित्रलेखा पाटील, रंजना सड़ोलीकर, डॉक्टर यानी महिलांना मासिक पाळी आणि स्वच्छतेबाबत माहिती दिली. वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे त्यांनी यावेळी पटवून दिले. त्याचबरोबर संबंधित भगिनींना सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात आले.

मासिक पाळीच्या वेळी महिलांचा थोडासा निष्काळजीपणा त्यांना हेपेटायटीस बी, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, तसेच वेगवेगळे संसर्ग यांसारख्या गंभीर आजारांकडे ढकलू शकते हेही त्यांना माहीत नाही. त्याचा परिणाम महिलांवर केवळ शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही दीर्घायुष्यावर होऊ शकतो. या गोष्टीचा विचार करून महिलांना मासिक पाळीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस’ साजरा करण्यामागचा उद्देश तरुण मुलींना आणि महिलांना मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी आवश्यक माहिती देणे, जेणेकरून त्या अनावधानाने कोणत्याही प्राणघातक आजाराला बळी पडू नयेत. या उद्देशाने मासिक पाळी दिनाच्या निमित्ताने नेरे येथे मासिक पाळी व वैयक्तिक स्वच्छतेबाबत जनजागृती आणि प्रबोधन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रंजना सड़ोलीकर यानी पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी डिस्पोजल मशीन ठेवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

नेरे येथे महिलाना सॅनिटरी पॅड वाटप व मेडिकल चेकअप कॅम्प , मासिक पाळीबाबत महिलामध्ये जनजागृती
Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.