स्वर्गीय संदेश जोशी ग्रुपला समाजसेवेची वेगळी वाट..
प्रतिनिधी : दिपक कांबळे
खारघर :
समाजासाठी काहीतरी करावं अशी अनेकांची इच्छा असते. पण त्यांच्यातले काहीजण मात्र खरोखरच उभे राहतात आणि आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या एखाद्या कामासाठी झोकून देतात. पण समाज पुढे जाण्याच्या प्रक्रियेत तो खारीचा वाटा खूप महत्त्वाचा असतो. स्व. संदेश जोशी हरपल्यानंतर लहान भाऊ शुभम जोशी स्वत: केलेला संघर्ष डोळ्या समोर ठेवून पेठ गावच्या स्वर्गीय संदेश जोशी या तरुण ग्रुप ने मागील तीन वर्षांपासुन् गरिबांना ,अनाथ आश्रम, वृद्धआश्रम मध्ये खाऊ वाटप करण्याचे व्रत हाती घेतलं होतं, अजूनही त्यांचं अन्नछत्र अव्याहतपणे सुरू आहे.
संदेश जोशी ग्रुप कडे आर्थिक सुबत्ता नसली तरी, मनाची श्रीमंती आहे. जादा वेळ श्रम करण्याची तयारी ठेवली, पण कुणाकडे हात पसरले नाहीत. हे सर्व कामे करताच त्यांनी आज काहीतरी वेगळे करण्याचे ठरवले खारघर सेक्टर २७ रांजणपाडा ते सेक्टर ३३ पेठगाव च्या दिशेने जाणारा संपून रस्त्याचे मधील वाढलेले गवत कापण्या करता महानगरपालिकेला अर्ज करून पालिकेच्या मार्फत काम पूर्ण करुन् घेतले . रस्त्यावरील गवत जास्त वाढल्याने अपघात होण्याची शक्यता जास्त होती.
या आधी त्यांनी गावातील प्राथमिक शाळेचे जे काही चक्रीवादळात नुकसान झाले ते स्वखर्चातून करून विद्यार्थ्यांना आसरा दिला तसेच त्यांची अनेक कामे आहेत. पाई चालत असलेल्या दिंडयांना पाणी वाटप करणे बिस्कीटचे पुडे देणे गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप करणे असे अनेक उपक्रम स्वर्गीय संदेश जोशी ग्रुप वेळोवेळी करत आहे. अशा सेवावृत्ती ग्रुप ला मानाचा मुजरा .