सय्यद अकबर यांना कोकण प्रदेश भाजप सह-संयोजक म्हणून जबाबदारी
पनवेल /प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांना कोकण प्रदेश भाजप सह-संयोजक म्हणून जबाबदारी देण्यात आल्याची घोषणा भाजप प्रदेश सरचिटणीस आम.संजय किणीकर यांनी केली.
अल्पसंख्यांक समाजाला ज्या योजना मिळाल्या आहेत. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धन्यवाद मोदीजी अभियान राबवले जात आहे.भाजप प्रदेश सरचिटणीस तसेच अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रभारी संजय किणीकर यांच्या अध्यक्षतेखाली संयोजन सभा मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात संपन्न झाली. सभेत प्रदेश सचिव तथा धन्यवाद मोदीजी महाराष्ट्र भाजप अभियान संयोजक श्वेता शालिनी, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश अध्यक्ष हाजी एजाज देशमुख, महामंत्री आतिक खान, प्रदेश उपाध्यक्ष इफ्तीकार अत्तार, सलीम बागवान, मेहबुब खेरवा, याकूब सय्यद, एड. तबस्सूम बैरागदार आदी प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.
अभियान अंतर्गत यामध्ये पीएम स्वनिधी, ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था, मोफत लसीकरण, आंगणवाडी मातृबंध योजना, उज्वला गॅस योजना, पं. दिन दयाल अंत्योदय योजना, पीएम किसान सन्मान निधी योजना, किसान पेन्शन योजना, किसान क्रेडिट कार्ड स्वाईल हेल्थ कार्ड, पीएम आवास योजना, वयश्री योजना, ई-श्रमकार्ड, करोना पेन्शन(मृत कामगारांच्या परिवारासाठी), आयुष्यमान भारत पीएम जनआरोग्य योजना,मोफत लसीकरण पीएम सुरक्षा विमा योजना, जल जीवन मिशन (हर घर नलसे जल योजना), पीएम मत्स्य संपदा योजना अशा अनेक योजना आहेत. त्यामधील अल्पसंख्यांक समाजाला मिळालेल्या योजनापैकी प्रधानमंत्री मोफत रेशन योजना, जनधन योजना, विद्यार्थ्यांना मिळालेली शिष्यवृत्ती योजना आहेत.
महाराष्ट्र राज्यातील किमान दहा लाख लाभार्थीना संपर्क साधून धन्यवाद मोदीजी योजना राबावली जाणार आहे.त्यातील अल्पसंख्यांक लाभार्थी सुमारे दिढलाख आहेत.त्यांना संपर्क करण्याची जबाबदारी अल्पसंख्यांक मोर्चाला देण्यात आली आहे.राज्यात यामध्ये पोस्ट कार्डद्वारे सुमारे दहा लाख लोकांना संपर्क होणार आहे. आहे.कोकणातील सर्व अभियानासाठी प्रदेश उपाध्यक्ष इफ्तीकार अत्तार व सय्यद अकबर यांना संयुक्तपणे जबाबदारी देण्यात आली आहे.
