नवीन पनवेलच्या नागरिकांना वेठीस धरणाऱ्या उडाण पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात….

प्रतिनिधी / पनवेल

पनवेल महानगरपालिका मा.विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी शिष्टमंडळा सोबत कामाची पाहणी केली.
नवीन पनवेल माथेरानला जोडणाऱ्या जीर्ण झालेल्या उडाण पुलामुळे वाहतूक कोंडी मोठया प्रमाणात होत होती.
पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन वाहन चालक जखमी झाले होते. तसेच मुखत्वे करून रिक्षा आणि दुचाकीस्वारांना याचा खूप त्रास होत होता.
यामुळे नवीन पनवेलचे प्रवासी नागरिक त्रस्त झाले होते.
आता मात्र वाहतूक विभागाची परवानगी मिळाल्यानंतर सिडकोच्या माध्यमातून कामाला सुरुवात करण्यात आली. दिनांक २० जानेवारी रोजी रात्री ९.०० वाजेच्या दरम्यान पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या देखरेखी खाली प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
याचप्रमाणे M.S.R.D.C. अंतर्गत ठाणा नाका ते खांदा कॉलनी येथे जाताना रेल्वे उड्डाण पुलाच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागासोबत पनवेल महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी पाठपुरवठा केला होता. सदरच्या ठिकाणची परिस्थिती M.S.R.D.C अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून त्या अनुषंगाने सदर पूलाचे मेंटेनन्स चे काम सुरू करण्याची मागणी केली होती.
कित्येक वर्षे रखडलेले काम पाठपुरावामुळे सुरू झाल्यामुळे नागरिकांन मध्ये समाधान व्यक्त होत आहे . लवकरच संबंधित पुल हा वाहतुकीसाठी एक मार्गिका बंद करण्यात येणार आहे. अशा वेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविणे संदर्भात वाहतूक शाखेच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे. प्रवासादरम्यान वाहन चालकांची आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वाकर यांच्यासोबत पर्यायी रस्त्या संदर्भाची प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन त्यांनी पाहणी झाली. त्या दरम्यान नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
दिशा दर्शक म्हणून यासाठी ठिकठिकाणी बोर्ड लावणे आणि इतर आवश्यकत्या सूचना फलक बसविण्यात येणार आहे तरी सुद्धा नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रितम म्हात्रे यांनी केले आहे.
सदर ठिकाणी पाहणी करताना मा.नगरसेविका प्रीती जॉर्ज, डॉ. सुरेखा मोहोकर, सारिका भगत यांच्या समवेत नगरसेवक राजेश हातमोडे, अनिल घरत, दीपक कुदळे, शिवराज साखरे, संदेश डिगोरकर, चिंतामणी गणेश मंडळाचे आश्विन डीचोलकर आणि सदस्य, नवीन पनवेलचे स्थानिक नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.