मा. पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), महेश घुर्ये, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, सुरेश मेंगडे, मा. सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, विनोद चव्हाण यांनी नवी मुंबई हद्दीत प्रतिबंधीत गुटखा व नशायुक्त पदार्थ विक्री व साठा करणाऱ्या इसमांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
 दिनांक १६/१०/२०२१ रोजी पोशि/२३७८ अर्जुन मनोहर पवार यांना त्यांचे गुप्त बातमीदारांकडुन मिळालेल्या बातमीची माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बासितअली सय्यद, पोउपनिरी. विजय शिंगे, सपोउपनिरी, इनामदार, पोहवा/१३७७ तायडे, पोहवा/१२५४ कांबळे, पोहवा/१३०१ उटगीकर सर्व नेमणुक अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबई असे खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळोजा गाव, स्टार हॉटेलच्या मागे, सुभान पटेल याच्या रुम मध्ये खारघर, नवी मुंबई येथे छापा टाकला.
छापा टाकला असता रु.३७,४६०/- किंमतीचा विमल पानमसाला, सुंगधी तंबाखू, गुटखा मिळुन आल्याने आरोपी मेमुजफ्फरमुराद धोंगरे, वय २९ वर्षे, यास ताब्यात घेउन खारघर पोलीस ठाण्यामध्ये गु.र. क ३६१/२१ भारतीय दंड सहिंता १८६० कलम १८८, २७२, २७३, ३२८ सह अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६, २७ अन्वये गुन्हा दाखल करुन नमुद आरोपीस अटक केलेली आहे.
त्याचप्रमाणे कळंबोली पोलीस ठाणे हददीत सेक्टर १० ई, संदीप पान शॉप मधुन विदेशी सिगारेट ६०००/-रू किंमतीचे मिळुन आल्याने पान शॉप चालक संदीपकुमार राम केलावन गुप्ता याचे विरूध्द कळंबोली पोलीस ठाणे गु.रजि.नं २९४/२०२१ सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ (जाहिरातीस प्रतिबंध आणि वाणिज्य, व्यापार निर्मीती, पुरवठा, वितरण) अधिनियम, २००३या कायदयाच्या कलम ७ (३),२०(२)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा, नवी मुंबई यांचेकडून अंमली पदार्थ व गुटखा विक्री विरोधात विशेष अभियान राबविण्यात येत आहे.
Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.