पनवेलच्या जडणघडणीत महिलांचे योगदान महत्वाचे – आमदार प्रशांत ठाकूर 
 
महिला दिनाचे औचित्य साधून केदार भगत मित्र परिवाराकडून हळदी कुंकू आणि महिलांचा सन्मान 
 
पनवेल(प्रतिनिधी)
पनवेलच्या जडणघडणीत महिलांचे योगदान महत्वाचे असून त्यांचा आदर्श घेऊन महिलांनी कार्यरत राहावे, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले. पनवेलमधील केदार भगत मित्र परिवाराच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित हळदी कुंकू आणि २१ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान तसेच चला खेळूया पैठणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्ष वर्षा नाईक, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर,रुचिता लोंढे, माजी नगरसेविका नीता माळी, सुहासिनी शिवणेकर, सुहासिनी केकाणे, नीता मंजुळे, लीना पाटील,  दत्ता केंद्रे ,नंदकुमार धोत्रे, आयोजक केदार भगत आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, महिला आणि पुरुष एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. महिला या त्यागमूर्ती असल्याने त्यांना नक्कीच मान सन्मान झाला पाहिजे, त्यांचा सन्मान हा सर्व समाजासमोर होतो ही आनंदाची बाब आहे. महिलांचे कार्य उदात्त असते. असे सांगतानाच केदार भगत आणि मित्र परिवार नेहमीच समाजाप्रती कार्यरत असतात. महिलांचा सन्मान करून त्यांना प्रेरणा मिळावी हाच हा कार्यक्रम उद्देश आहे. त्यामुळे केदार भगत आणि मित्र परिवाराचे कौतुक यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. पनवेलमध्येही असाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.. भाजपचे युवा नेते केदार भगत यांच्या मित्र परिवाराच्यावतीने हळदी कुंकू सोबत गुरु कदम यांच्या चला जिंकूया पैठणी या खेळाचेही आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.  महिलांना नेहमी आकर्षित करणारी पैठणी या कार्यक्रमात विजेत्यांना बक्षिस म्हणून देण्यात आली. त्यामध्ये लकी ड्रॉ, ३ पैठणी साड्या , ५१ आकर्षक बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमाचे उदघाटन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. तर पारितोषिक वितरण समारंभ वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, पूनम ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.  याशिवाय या कार्यक्रमात २१ कर्तृत्वान महिलांचा यथोचित सन्मान देखील करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गीतांजली  भगत, निकिता  पाटील ,सायली  भगत, मंजिरी  भगत ,जिन्यासा  भगत ,प्रज्ञा भगत  ,योगिता  डांगरे ,प्रीती  पाटील ,प्रणाली  बहिरा ,अवंती गडगे ,अंकिता बहिरा ,सिमीन  साळवी ,अनिता  गायकर ,माधुरी अनिकेत सावंत, वैभवी  वाघीलकर, पूनम  पारचे, प्रचिती  शेट्ये, श्रेया  जाचक, ज्योत्सना दसवते, भक्ती शिंदे, अंजली  अनभुले, प्रीती  दसवते, भाविक  शिंदे, संजीवनी  वर्तले, अनिता  ढगे, कांचन  कदम, स्वप्नाली  धनावडे, प्रतीक्षा दसवते, आरती  घरत, अनिता मढवी, सुमित दसवते, संकेत दसवते, भावेश शिंदे, संतोष वर्तले , हर्षद गडगे,नितेश भगत,योगेश साळवी,अनिकेत सावंत,ब्रिजेश बहिरा,गौरव सावंत,साहिल मोरे,निखिल खैरे,श्रेयश शिंदे,रवी पारचे, सचिन  जाचक, प्रथमेश धनावडे, जयदीप भगत ,मंगेश भगत ,मंदार भगत ,सुबोध पाटील ,चिन्मय भगत ,निहाल म्हात्रे ,सिद्धू मोरे,यज्ञेश पाटील,अथर्व पाटील .सचिन भगत ,जयेश भगत ,कुमार भगत ,मछिंद्र भगत ,बाळकृष्ण भगत ,नितीन पाटील ,संतोष कथोरे यांनी विशेष प्रयत्न केले.
Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.