व्यवसायिक कर्तव्यातुन अध्यात्मिक संस्कृतीत लोकांच्या स्वप्नातील निवासस्थान म्हणजे दुधे विटेवरी प्रोजेक्ट
प्रतिनिधी :-
पनवेल जवळील करंजाडे सेक्टर ३ ए, प्लॉट नं ०१, येथे असलेल्या दुधे बिल्डर्स यांच्या दुधे विटेवरी या प्रोजेक्ट मध्ये विठ्ठल रुख्मिणी मंदिराची प्रांगणात प्राण प्रतिष्ठा करण्यात आल्याने आज येथे जमलेल्या सदनिका सदस्य, वारकऱ्यांना व भाविकांना प्रत्यक्ष विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन घेतल्याचा भास झाला.
त्यानिमित्ताने निमंत्रक उद्योजक तुकाराम शेठ उकर्डा दुधे यांनी आज सकाळी या धार्मिक कार्यक्रमानिमित्त विधी सोहळा व होमहवन, मंदिर कलश पूजन, व त्यानंतर विठ्ठल रुख्मिणी मूर्ती स्थापना आणि श्री ची महाआरती आयोजित करण्यात आली होती.
या धार्मिक विधी साठी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश गोडे, उदयोजक एकनाथ शेठ दुधे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख पंढरपूर चे महेश साठे, राष्ट्रवादी जिल्हा परिषद सदस्य जळगावचे रवींद्र पाटील
सरचिटणीस अतुल चव्हाण, नगरसेवक शंकर म्हात्रे, माजी सभापती कृष्णाशेठ पारंगे, माजी जि.प. सदस्य सुभाषशेठ म्हात्रे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे, उदयोजक ज्ञानदेव दुधे, नंदिनी म्हात्रे, सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती ठक्कर आदी सह मोठ्या प्रमाणात परिसरातील भक्तगण या धार्मिक सोहळ्यास उपस्थित होते.
त्या निमित्ताने विठ्ठल रुख्मिणी हरिपाठ मंडळ कामोठे सेक्टर ९ हरिपाठ साथ ह.भ.प शंकर म्हात्रे, कामोठे व ह.भ.प महादेव महाराज मांडे यांचे सुश्राव्य किर्तन आयोजित करण्यात आले होते .
त्यानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
कोट-
अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाले असून आज दुधे विटेवरी या प्रोजेक्ट मध्ये झाले विठ्ठल रुख्मिणी ची स्थापन केली आहे .
पंचक्रोशीतील लोकांनी याचा लाभ घ्यावा तसेच जेष्ठनागरिकांना सुद्धा एकादशीच्या वेळीला प्रत्यक्ष पंढरपूर येथे जात आले नाही तरी त्यांना येथे दर्शन घेतल्याचा आनंद मिळेल- उद्योजक तुकाराम शेठ उकर्डा दुधे