खोपोली नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 9 मधील नगरसेवक नासिर पटेल यांच्या प्रयत्नाने सारसन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्र उभारण्यात आले .

बऱ्याच वर्षा पासून स्थानिकांनी ही मागणी धरून ठेवली होती पण त्या भवनाचे काम प्रलंबित होते .

शहरात संस्कार केंद्र उभारणे ही लोकशाही ची गरज आहे आणि महामानव यांच्या नावाने असे भवन शहरात उभारले गेले पाहीजेल आज ते कार्य माझ्या व आपल्या सहकार्यातून झाले यांच समाधान आहे. नगरसेवक नासिर पटेल यांनी मत मांडताना पालिका प्रशासन व स्थानिक लोकांच्या सहकार्याने या वास्तूचे लोकार्पण नगराध्यक्षा सुमन औसरमल , उपनगराध्यक्षा विनीता कांबळे यांच्या हस्ते आज २८ डिसेंबर रोजी होत आहे असे घोषित केले .

नगरसेवक मोहन औसरमल यांचे मार्गदर्शन व सहकार्य असल्याने विशेष आभार मानले.

त्यावेळी सन्मानित प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सुनील पाटील,किशोर पाटील,रवी रोकडे ,स्थानिक ग्रामस्थ, नरेश जाधव उपस्थित असणाऱ्या सर्वांचे स्वागत व आभार मानले . अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी रित्या संस्कार केंद्र लोकार्पण सोहळा संपन्न झाल्याने स्थानिकांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता .

ग्रामस्थांनी स्थानिक नगरसेवक नासिर पटेल व नगराध्यक्षा यांचे यावेळी भावुक मनाने आभार व समाधान मानले .

 

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.