खारघर सेक्टर 34-35 मधील भूखंडांच्या मालकी हक्काबाबत वाद पण संवर्धनासाठी निसर्ग प्रेमी पुढे
खारघर तळोजा कॉलोनी वेलफेर असोसिएशन ने स्थानिक प्रशासन व सिडको प्रशासनाबाबत तीव्र नाराज व्यक्त केली.
प्रतिनिधी खारघर : साबीर शेख
दि. 20 फेब्रुवारी रोजी खारघर सेक्टर 35 चे राहिवासी, सिडको ने पूर्व घोषित -खेळ मैदानासाठी, सेक्टर 35 येथील साई हरिद्रा / साई वंडर ग्रह निर्माण संस्थेच्या थेट समोर असलेल्या भूखंडावर, स्वच्छता अभियान तसेच व्होली बॉल खेळण्याचे कार्यक्रम नियोजन होते.
ह्या स्वच्छता अभियानासाठी, नागरिकांनी स्वखर्चाने वर्गणी काढून झूडपे, वेली तसेच मोठ्या प्रमाणावर डिबरीस स्वच्छ करण्यासाठी जेसीबी व सिडको ने हक्क दिलेल्या खेळाच्या मैदानात, व्होली बॉल खेळण्याचे आयोजन केले होते.
नागरिक श्रमदानातून काम करीत असताना , जवळ च्या परिसरातील स्थानिक व्यक्ती अचानक पणे हि आपलीच जागा आमची असून, सिडको ने आम्हाला पैसे थकीत असून, मालकी हक्क असल्याचा दावा करीत, वाद हुज्जत घालीत, काम थांबावण्याचा आग्रह करीत असताना उपस्थित नागरिकांनी त्या व्यक्तीस वेगवेगळ्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केल्यावरही, सदर व्यक्ती आक्रमक पणे, त्यांच्याशी वादविवाद करू लागली.
तरीही नागरिकांनी त्या भूखंडावरील श्रमदानातून स्वच्छता अभियान पूर्ण केले.
खारघर सेक्टर 30-36 मधील अनेक भूखंड खेळ व गार्डन साठी आरक्षित असूनही, अश्या अनेक प्रकारच्या जागेवर बळजबरीच्या हक्कादारामुळे, काही वेळा नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे.
तसेच, सिडको हि सदर च्या अश्या भूखंडांवर आपल्या मालकी हक्काचा अधिकृत नामफलक बोर्ड लावण्यास हलगर्जीपणा करीत असल्यामुळे,जे लोक स्वयंघोषित मालकीचा दावा करत आहे, त्यांचे हेकेखोरपणा ,हिंमत वाढत चाललेली आहे जी भविष्यात अशांतता, वाद ,भांडण निर्माण होण्यास कारणीभूत असतील.
ह्यामुळेच स्थानिक प्रशासन व सिडको प्रशासनाबाबत लोकांमध्ये तीव्र नाराजगी पसरत असून, वेळीच प्रशासने पाऊले न उचल्यास लोकांचा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही… असा इशारा खारघर तळोजा कॉलोनी वेलफेर असोसिएशन ने दिला आहे..