मृत आत्म्याने येऊन केल्या पुनर्विकास करारावर स्वाक्षऱ्या

पनवेल मधील गुलशन इमारतीच्या पुनर्विकास प्रकरणात नियम बसवले धाब्यावर

बांधकाम  थांबविण्याचा न्यायालयाचा निर्णय 

पनवेल मध्ये एका इमारतीच्या पुनर्विकास प्रकरणाची रंजक माहिती समोर आली आहे. मयत अब्दुस तुंगेकर यांच्या आत्म्याने येऊन मृत्युपश्चात वेळोवेळी सभा, अजेंडे, निर्णय यावर स्वाक्षर्‍या केल्याची धक्कादायक माहिती हाती लागली आहे. सदर प्रकरणाची तक्रार करणाऱ्यांना त्या तक्रारीतून “काही विशिष्ट लोकांची” नावे वगळण्याच्या वास्तवास देखील सामोरे जावे लागले आहे.
याबाबत सविस्तर हकिकत अशी आहे की तक्रारदार आदिम मुल्ला आणि रमिझ मुल्ला यांच्या वडिलांची प्लॉट क्रमांक २७८/४ मुल्ला अब्दुल हमीद मार्ग येथे जागा होती.१९९४ साली या ठिकाणी गुलशन नावाची इमारत उभारण्यात आली. सदर इमारतीमध्ये १२ सदनिका तर सहा व्यावसायिक स्वरूपाचे गाळे निर्माण करण्यात आले. पैकी दोन सदनिका आपल्यापाशी ठेवून त्यांच्या वडिलांनी बाकीची मालमत्ता विक्री केली.१९९७ मध्ये त्यांच्या वडिलांनी नगरपरिषदेची रीतसर परवानगी घेऊन इमारती मध्ये सातव्या गाळ्याची निर्मिती केली.२००७ मध्ये ३०९ क्रमांकाची सदनिका तक्रारदार यांच्या चुलत भाऊ झैद नूर मुल्ला याला बक्षीस पत्राद्वारे देण्यात आली.२००८ साली नगरपरिषदेच्या रीतसर परवानगीने मुल्ला कुटुंबीयांनी सातव्या गाळ्यांमध्ये मेझनिन फ्लोअर बांधला. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 2010 साली गुलशन इमारतीमधील रहिवाशांनी गुलशन सोसायटी फॉर्म केली.नोंदणीकृत दस्त नसल्याचा ठपका ठेवत सोसायटीने मुल्ला कुटुंबियांना सदनिका क्रमांक 104 आणि गळा क्रमांक सात यांना सोसायटीमध्ये समाविष्ट करण्यास नकार दिला. असे असले तरीदेखील सर्व सदस्यांनप्रमाणेच या दोन मिळकतीचा मेंटेनन्स मात्र सोसायटी नित्यनेमाने घेत होती. कालांतराने तक्रारदार यांचे वडील यांनी गळा क्रमांक सात हा बक्षीस पत्राद्वारे रमीझ मुल्ला आणि आदिम मुल्ला यांच्या नावे केला.
मार्च २१ मध्ये मुल्ला बंधूंना सोसायटीच्या पुनर्निर्माण विषयाबाबत बैठकीसाठी पाचारण करण्यात आले. सदर बैठकीत पुनर निर्माणासाठी विकसक म्हणून मंगेश परुळेकर यांची निवड झाल्याचे सांगण्यात आले. ही बैठक माननीय सहाय्यक निबंधक यांच्या उपस्थितीत पार पडत होती हे विशेष.आदिम मुल्ला आणि रमिझ मुल्ला यांनी यापूर्वी पुनरनिर्माण विषयक कुठलाही पत्रव्यवहार सोसायटीकडून मिळाला नसल्याचे ठणकावून सांगितले. तसेच अंतिम स्तरापर्यंत गोष्टी आल्या असून सुद्धा कित्येक रहिवाशांना अंधारात ठेवण्यात आले. त्यामुळे सदरच्या पुनर्निर्माण प्रक्रियेला विरोध दर्शवून त्यांनी बैठक सोडली.
पुनर्निर्माण करायचेच असा चंग बांधून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांसमवेत नियमबाह्य पद्धतीने दस्तावेज निर्माण केले. यात कित्येक रहिवाशांच्या पुनर्निर्माण प्रक्रियेतील दस्तावेजोंवर खोट्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. तक्रारदार आदिम मुल्ला आणि रमिझ मुल्ला यांच्या देखील खोट्या स्वाक्षऱ्या केल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे १४.०१.२०२० रोजी मृत झालेल्या अब्दुस सालाम तुंगेकर या सोसायटीमधील सदस्याच्या त्यांच्या मृत्यूपश्चात बैठका अजेंडे आदी दस्तावेजतयार तयार करताना खोट्या स्वाक्षऱ्या केलेल्या आढळून आल्या. सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयातून पुनर्निर्माण बाबत कागदपत्रांची प्रत मागवली असता हा सारा खोटेपणा उघड झाला.

गुलशन इमारत विवाद प्रकरणी मुल्ला बंधूंनी सोसायटीच्या पुनर्निर्माण विषयाबाबत घेतली पत्रकार परिषद

असे असून देखील धोकादायक इमारत असल्याचे प्रमाणपत्र पुढे करत पुनर्निर्माण प्रकल्प पुढे रेटण्यात आला.आदिम मुल्ला आणि रमिझ मुल्ला यांनी न्यायालयात धाव घेतली.दिवाणी स्तर न्यायालयाने सदर इमारतीचे बांधकाम थांबविण्याचे आदेश पारित केले आहेत. झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणात आदिम मुल्ला आणि रमिझ मुल्ला यांनी पनवेल शहर पोलीस स्थानकांमध्ये संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
उच्च न्यायालयातील उन्हाळी सुट्टी विशेष कोर्टाने देखील दिवाणी न्यायालयाच्या बांधकाम थांबविण्याच्या निर्णयास दुजोरा दिला आहे.

चौकट :- सदर पुनर्विकास प्रक्रिया साठी देण्यात आलेली वर्तमान पत्र जाहीर निविदा नोटीस नुसार निविदा मागवायचा कालखंड संपल्यानंतर सुमारे महिनाभर उशिराने विकसकाने निविदा दाखल केल्याचे देखील उघड झाले आहे. सदर प्रकल्पात संपूर्ण प्रक्रिया, पुनर्निर्माण प्रक्रिया यांना लागू असणारे सगळे नियम धाब्यावर बसवण्याचा विक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे. याच मुद्द्यावर तक्रारदार रमिझ मुल्ला आणि आदिम मुल्ला हे सहाय्यक निबंधक यांच्याकडे अपील करणार आहेत

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.