पनवेल स्मार्ट मॉमिज या समूहाने प्रिन्स आणि प्रिन्सेस २०२२ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

पनवेल  प्रतिनिधी

काल पनवेल स्मार्ट मॉमिज यांनी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे प्रिन्स आणि प्रिन्सेस २०२२ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पनवेल शहरातील बालकलाकारांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेला पनवेल नगरपरिषदेचे मा.नगराध्यक्ष मा.श्री.जे.एम.म्हात्रे साहेब, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.महेंद्र घरत साहेब, आई सौ.रंजना म्हात्रे, मम्मी सौ.सुनिता पाटील, मी स्वतः विरोधी पक्ष नेता प्रितम जनार्दन म्हात्रे, पत्नी सौ.ममता म्हात्रे, नगरसेविका सौ.प्रीती जॉर्ज, श्री.गौरांग जेठवा, श्रीमती.सुजाता ठक्कर, पनवेल शहरातील इतर मान्यवर तसेच बालकलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना चषक व सन्मानपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले.

पनवेल स्मार्ट मॉमिजच्या अध्यक्षा सौ.शितल ठक्कर यांनी बालकलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अतिशय सुंदर आयोजन केल्याबद्दल त्यांचे उपस्थित मान्यवरांनी मनःपूर्वक अभिनंदन!

 

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.