रायगड जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाला सर्वात जास्त जनमत मिळाले आहे.
पाली, खालापूर, माणगाव, म्हसळा, तळा या पाच नगरपंचायतीमध्ये मतदार वर्गाने राष्ट्रवादी आणि शेकापक्षला जनमताचा कौल दिला आहे.
पाली नगरपंचायतीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस 6, शेकाप 4, शिवसेना 4, भाजप 2, अपक्ष 1 असा निकाल लागला आहे. त्यामुळे या नगरपंचायतीत वर्चस्व मिळविणार्या राष्ट्रवादी-शेकाप आघाडीचाच नगराध्यक्ष सत्ता स्थापित करतील.
खालापूर नगरपंचायतीचा निकाल शेकाप 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 तर शिवसेना 8 अशा जागा मिळाल्या
माणगाव नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागांवर तर शेकापसह इतरांना 2 जागा मिळाल्या तर शिवसेनेला 7 ठिकाणी विजय मिळाला आहे.
तळा नगर पंचायत राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा पटकावल्या तर सेनेला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागले.
म्हसळा नगरपंचायतीत 13 जागा प्राप्त करून राष्ट्रवादीने आपली सत्ता कायम राखली आहे. शिवसेनेला 2 तर काँग्रेस पक्ष 2 जागांवर निवडून आला आहे.
पोलादपूर नगरपंचायतीमध्ये शिवसेना १० जागा मिळवून सत्ता राखण्यात यशस्वी झाली आहे. काँग्रेसला ६ तर भाजपला तर एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.