नवी मुंबई, कळंबोली येथील मॅकडोनल्डचे समोर पुणे मुंबई वाहीनीवरील बस स्टॉपजवळ दिनांक २७/११/२०२१ रोजी शर्मा ट्रॅव्हल्स मधुन अंबेजोगाई येथुन सोने खऱेदी करण्यासाठी आलेल्या व्यापा-याच्या डोळ्यात मिरची पुड फेकुन घातक शस्रासह दरोडा टाकुन त्याच्या जवळील १९ लाख रुपयांची लुट करुन पसार झाले होते.
कामोठे पोलीस ठाणे गु.रजि.क्र. ४६१/२०२१ भा.दं.वि. ३९५,३९७,३४१,१२० (ब) भारतिय हत्यार कायदा कलम 4,25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील दरोडेखांपैकी ०६ दरोडेखोरांना ७२ तासांच्या आत गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेल नवी मुंबई यांनी अटक करुन लुटलेली सर्व रक्कमेसह गुन्ह्यात वापरलेली घातक शस्त्रे व वाहने हस्तगत करण्यात आली .
सदरची घटना घडल्यानंतर घडनेचे गांभिर्य पाहुन तात्काळ अपर पोलीस आयुक्त गुन्हे, महेश घुर्ये एक तासाचे आत घटनास्थळी पोहचले. पोलीस उप आयुक्त गुन्हे सुरेश मेंगडे यांनी घटनास्थळी भेट देवुन उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षिदारांकडे सखोल चौकशी केली.
अपर पोलीस आयुक्त, गुन्हे यांनी सहा. पोलीस आयुक्त गुन्हे, संबंधित पोलीस ठाणे प्रभारी त्यक्षदर्शी साक्षिदारांच्या मदतिने घटनास्थळी गुन्हा कशा पद्धतिने घडला गुन्हा सदृश्य परिस्थितीचा (Scene of offence recreate ) आढावा घेवुन गुन्हा कशा पद्धतिने घडला आरोपी कोठुन कसे पळाले याचे प्रात्यक्षिक करुन आरोपींचा माग, गुन्ह्याची पद्धतीबाबत माहीती प्राप्त केली.
त्यानंतर तात्काळ अपर पोलीस आयुक्त गुन्हे महेश घर्ये यांनी संवेदनशिलता लक्षात घेता गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टिने पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या पर्यवेक्षनाखाली एक विशेष तपास पथक स्थापन केले.
१. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा कक्ष ०२, पनवेल नवी मुंबई. (प्रमुख प्रभारी अधिकारी)
२. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा कक्ष ०१, नवी मुंबई.
३. मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा कडील अधिकारी व अंमलदार.
४. पोलीस नाईक/४४१३ अजिनाथ फुंदे, गुन्हे शाखा.
पोलीस आयुक्त, पोलीस सह गुन्हे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, सहा. पोलीस आयुक्त विनोद चव्हाण, विनायक वस्त गुन्हे शाखा यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशीत केले होते.
सदर गुन्हा उघडकीस आणणेकामी गुन्हे शाखा कक्ष 02 यांच्या कडुन समांतर तपास करीत असताना स.पो.नि. प्रविण फडतरे, गायकवाड, पोलिस उप निरीक्षक वैभव रोंगे, मानसिंग पाटील व कर्मचारी यांनी गुन्ह्यातील जखमी फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षिदार, घटनास्थळावरील प्राप्त सी.सी.टी.व्ही. फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे अतिशय कौशल्यपुर्ण व सलग तपास करुन कोणतेही धागेदोरे नसताना गुन्ह्यातील आरोपी निष्पण्ण करुन मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे व कर्नाटक राज्य येथे जावुन अतिशय शिताफिने अद्यापर्यंत खालिल ०६ दरोडेखोरांना अटक केलेली आहे. अटक आरोपींकडुन गुन्हा करतेवेळी वापरलेली ०३ घातक शस्त्रे, फिर्यादी यांची रक्कम ठेवलेली बॅग, गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने व लुटलेली संपुर्ण रक्कम अशी एकुण २२ लाख ५४ हजार एवढ्या रकमेची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे- ➡️
१. अनिकेत जोमा म्हात्रे, वय २३ वर्षे, रा. ओवळेगाव, पो. पारगाव, ता. पनवेल जि. रायगड.
२. कार्तिक सुशिल सिन्हा, वय- २४ वर्षे, धंदा- ड्रायव्हर, रा. कल्पनानगर, पाषाण लिंक रोड, बानेर पुणे.
३. किरण विजय पवार, वय- २१ वर्षे, धंदा- नोकरी, रा. घोटगाव, पो. कोयनावेळे, ता. पनवेल, जि. रायगड.
४. भिमा रामराव पवार, वय- २१ वर्षे, धंदा- नोकरी, रा. घोटगाव, पो. कोयनावेळे, ता. पनवेल, जि. रायगड.
५. मनोज गुरम्या राठोड, वय-२२ वर्षे, धंदा- मासे विक्री, रा. रुम नं. ५०४४, डॉ. बाबासाहेब आंबडेकरनगर, कफ परेड, कुलाबा, मुंबई.
६. लक्ष्मण सुभाष राठोड उर्फ लकी उर्फ वाघ्या वय-२१ वर्षे, रा. देविचापाडा, तळोजा
भरदिवसा सोने व्यापा-यावर दरोडा टाकुन १९ लाखाची रोखड लुट करणा-या ०६ दरोडेखोरांना ७२ तासांच्या आत गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेल, नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्या बद्द्ल त्यांच्या कार्याच कौतुक सर्वीकडे होत आहे सर्व नागरिकांनी पोलिसांच्या कारवाही ला न घाबरता आपल्या सोबत घडलेली बेकायदेशीर घटना न्याय मागण्यासाठी सदैव पोलिस प्रशासना पुढे मांडावी व न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवावा अशी अपेक्षा पोलिसांची असते असे व्यक्तव्य गिरीधर गोरे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल यांनी केले.