*मोरबे ते करंबेळी व पनवेल ग्रामीण भागातील सर्व रस्ते डागदुगीकरण खड्डे भरून घ्यावे म्हणून पनवेलचे गटविकास अधिकारीना निवेदन*

प्रतिनिधि (साबीर शेख)

गणेश उत्सव सन जवळ आल्याने प्रवासी वाहतूक वर्दळ मोठ्या प्रमाणात होत आहे पण पावसाळ्यानंतर पनवेल शहरातील रस्ते जीव घेणे झाले आहेत म्हणून लवकरात लवकर पनवेल शहरातील विशेषता मोरबे ते करंबेळी रस्ता अतिशय दयनीय परिस्थिती असून आदिवासी बांधवांचे भरपूर हाल होत आहेत त्यावर लवकरात लवकर सुधारणा व्हावी व रस्ते प्रवास सुरक्षित व्हावा त्या अनुषंगाने संबंधित हद्दीतील सर्व ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी ,ग्रामसेवक यांना परिस्थिती कळवली . त्याचप्रमाणे बी.डि.ओ भोये यांना लेखी निवेदन करण्यात आले आहे.

तालुक्यातील सर्वच ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची परिस्थिती दयनीय असून ते रस्ते किमान खड्डे भरून नागरिकांना गैरसोय होणार नाही यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस आणि माजी उपसभापती राजेश केणी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि शेकाप कार्यालयीन चिटणीस विलासजी फडके त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते अनिल उलवेकर आदी शिष्ट मंडळ उपस्थित होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.