चोरी झालेली स्कुटी खारघर वाहतूक पोलिसांनी केली हस्तगत ,

खारघर : प्रतिनिधी (प्रेरणा गावंड)

खारघर वाहतूक पोलीस नाईक सुरेश कासार व अमलदार मयुर पाटील हे नेहमीप्रमाणे खारघर शहरामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये या करिता मोटर सायकल वरून गस्तीवर असताना उत्सव चौक सेक्टर ५ जवळील डोंगरी गवतात एक निळ्या रंगाची होंडा एक्टिवा स्कुटी धूळ खाऊन पडलेली दिसून आली स्कूटीचे सीट लॉक  व पेट्रोल लॉक ही तुटलेले होते.

स्कुटी चा नंबर एम एच वीके९३३८असा असून सदर पोलिसांनी गाडीचा नंबर तपास करता गाडीचा नंबर चुकीचा असल्याचे वाहतूक अंमलदार मयुर पाटील यांना कळाले मग त्यांनी गाडीचा चेसिस नंबर व इंजिन नंबर या दोन्ही नंबरची चौकशी जवळील होंडा शो रूम मध्ये तपास करता त्यांना गाडीचा खरा नंबर एम एच ४३ बीवी ७९१९ व गाडी मालक दिनेश कुमार पटेल राहणार रबाळे त्यांच्या नावावर असल्याचे कळाले त्यांनी ताबडतोब फोन करून दिनेश पटेल यांना गाडीची ओळख पटवण्या करता खारघर येथील वाहतूक शाखेचे जवळ बोलावले दिनेश पटेल यांनी गाडी बघताच ही माझी स्कुटी आहे असे खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. योगेश गावडे यांना सांगितले व दिनेश पटेल यांनी माझी स्कुटी ३१ डिसेंबर २०२१ रोजी उशिरा रात्री सक्षम सोसायटी रबाळे येथून चोरी झाल्याचे सांगितले व दिनांक १ जानेवारी २0२२ रोजी जवळील रबाळे पोलीस ठाण्यात गाडी चोरी झाल्याचे कळवले .

खारघर वाहतूक पोलिसांनी रबाळे पोलीस ठाण्यात चौकशी केली असता त्या गाडीचे नोंद असल्याचे रबाळे पोलिसांनी सांगितले पुढील संपूर्ण तपासणी करून दिनेश पटेल यांचा मोठा भाऊ शंकरलाल पटेल यांना ही गाडी दिनांक 16/2/2022 या दिवशी रबाळे पोलीस अंमलदार प्रकाश पाटील यांच्या साथीने देण्यात आली व खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गावडे यांनी पोलीस नाईक श्री. सुरेश कासार व पोलीस अमलदार श्री. मयुर पाटील यांनी केलेल्या पराक्रमी कामाचे कौतुक केले .

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.