*10 जून 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रेमाच्या त्रिकोणात सापडलेला मजनू चित्रपटाचा ट्रेलर संपूर्ण महाराष्ट्रभर हेलिकॉप्टर मधून दिमाखात प्रदर्शित

मजनू चित्रपटाचा ट्रेलर संपूर्ण महाराष्ट्रभर हेलिकॉप्टर मधून दिमाखात प्रदर्शित*

प्रतिनिधी
सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत शिवाजी दोलताडे दिग्दर्शित गोवर्धन दोलताडे भरत चंगेडे डॉ दिपाली/गर्जे सानप निर्मित सहनिर्माते इरफान एम भोपाली कार्तिक दोलताडे बहुचर्चित मजनू चित्रपट 10 जून 20 22 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होत आहे.

मजनू चित्रपटाची कहाणी एक अजरामर होईल अशी प्रेम कहानी आहे अनेक तरुणांच्या मनावरती राज्य करील आणि प्रेमाच्या त्रिकोणतून एका मजनूची आपलं खरं प्रेम जिंकण्यासाठी आणि प्रेमाची सुरुवात छान होते तसाच प्रेमाचा शेवट पण तितकाच चांगला झाला पाहिजे यासाठी मजनू होऊन एका मजनू ने कशा पद्धतीने कसरत केली यावरती भाष्य करणारा मजनू चित्रपट आपणा सर्वांसाठी एक फॅमिली पॅक चित्रपट असणार आहे आणि हा चित्रपट नक्कीच सर्वाना आवडेल असं चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले चित्रपटाचे चित्रीकरण नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यातील सर्व भागांमध्ये केले आहे कोरोनाच्या अगदी कठीण काळात चित्रीकरण झाल्यामुळे चित्रीकरण करत असताना खूप समस्यांना तोंड द्यावे लागले तरीपण सर्वांनी एकजुटीने कुठलाही विचार न करता चित्रीकरण अगदी चांगल्या पद्धतीने केले या सगळ्यांमध्ये सर्व टीमचा व कळवण करांचा खूप मोठा हातभार लागला चित्रीकरण करत असताना खूप जीवावर खेळून या चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे तसं तुम्ही सर्वजण चित्रपटात लोकेशन च्या माध्यमातून पहातालच आणि तुम्हा सर्व प्रेक्षकांना ते खूप आवडेल सर्व महाराष्ट्रातील तमाम जनता हा चित्रपट पाहून आम्हाला भरघोस यश मिळवून देईल अशी आशा निर्माता गोवर्धन दोलताडे व्यक्त केली


मजनू चित्रपटात रोहन पाटील नीतीश चव्हाण स्वेतलाना अहिरे सुरेश विश्वकर्मा मिलिंद शिंदे अरबाज शेख प्रणव रावराणे भक्ती सावंत आदिती सारंगधर माधवी जुवेकर रंजीत रणदिवे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सहकलाकार शुभम बैरागी दर्शन बोरसे पियुष गोंदकर विवेक हिरे ऋतिक निकम तेजस कालवडीया ईश्वरी गोंदकर चैताली देवरे सोनाली गायकवाड तपस्या गांगोडे ऋतुजा वावरे सानिया पगार सायली शेलार यांनी सहकलाकार म्हणून आपल्या भूमिका साकारल्या आहेत
चित्रपटाला पी शंकरम सचिन अवघडे साजन विशाल यांचं संगीत आहे सलमान आली आदर्श शिंदे संदीप उबाळे बेला शेंडे आनंदी जोशी यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत गोवर्धन दोलताडे अविनाश गांगोडे दिपक गायकवाड साजन बेंद्रे यांनी मजनू चित्रपटाची गीतं लिहिली आहेत

 

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.