पनवेल महापालिकेचा आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर विभाग मधील सेक्टर ३५ व ३६ येथील खुटूकबंधान तलाव याठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.
अज्ञात लोकांनी या ठिकाणी डेब्रिज टाकून हा परीसर अस्वच्छ केला होता. पालिकेने पुढाकार घेऊन हा परिसर आधी स्वच्छ केला आणि नंतर या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला .
यावेळी सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी, आयएसआर फाउंडेशनचे अध्यक्ष धर्मेंद्र कौर ,स्वच्छता सल्लागार सदाकत अली अन्सारी, स्वच्छता निरीक्षक कुणाल गायकवाड, स्वच्छता निरीक्षक संदीप भोईर, स्वच्छता निरीक्षक अतुल मोहोकार, स्वच्छता निरीक्षक अजय ठाकूर , ग्रीन खारघर टीम चे सदस्य तसेच हाईड पार्क सोसायटी चे नागरिक , सेक्टर ३५ व ३६ मधील नागरिक, खारघर येथील स्वच्छता दूत उपस्थित होते.