रविवार 19 डिसेंबर 2021 रोजी उलवे येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. सिद्धिविनायक मंदिर उलवे येथे श्री गणेशाचे दर्शन घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पनवेल विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे उपस्थित होते.
या कार्यक्रमास माई ताई भोईर, सरपंच गव्हाण ग्रामपंचायत, हेमंत पाटील, सदस्य गव्हाण ग्रामपंचायत, राजेंद्र घरत उपाध्यक्ष, भातगिरणी तालुका पनवेल आदी मान्यवर आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
या कार्यक्रम ची सुरुवात विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते विभागातील आरक्षित असलेल्या गार्डन प्लॉटवर वृक्षारोपण करुन करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना प्रीतम म्हात्रे यांनी उपस्थित रहिवासीयांना अशा प्रकारचे पर्यावरणाच्या दृष्टीने घेतलेल्या कार्यक्रमाबद्दल आभार मानले तसेच यापुढेही उलवे विभागांमध्ये कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारचे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष उलवे नोड आणि त्यांची जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था संपूर्ण भक्कम पणे रहिवासीयांच्या सोबत असेल याची ग्वाही दिली.
प्रत्येक नागरिकाने नुसते झाड न लावता लावलेले झाड हे जर दत्तक घेतले आणि त्याचा आपल्या परिवारातील सदस्य प्रमाणे जतन करून त्याची वाढ केली तर त्या मधून जो सुखद अनुभव मिळतो तो कोणत्याही पैशाने विकत घेता येत नाही असे पनवेल विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी आवर्जून सांगितले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन सचिन राजे येरुणकर यांनी केल्या बद्दल उपस्थित मान्यवरांकडून त्यांचे सुद्धा कौतुक करण्यात आले या कार्यक्रमासाठी नामदेव साळवी, अध्यक्ष श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट सेक्टर 17 उलवे, सुरेश फाटक, जेष्ठ समाजसेवक, प्रवीण झिंगे, मंगेश सावंत, निलेश पाटील, गणेश कदम, अमित जस्वाल, विनोद थोरात, नलवाडे, प्रकाश सुर्वे, विलास चांदेल, सौ. रचना सचिन येरुणकर, सौ. कीर्ती फटाक, सौ. झिंगे, सौ. कार्तिकी कदम आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.