राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने रायगड जिल्ह्यात वृक्षारोपणाचा उपक्रम
पनवेल/ प्रतिनिधी(प्रेरणा गावंड)
वृक्षारोपण हाच पर्यावरण असमतोलावर रामबाण उपाय’
दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठय़ा प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी कारणीभूत आहेत.
पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना सामोरे जाणे भाग पडत आहे.यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघांचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांनी केले आहे.
पनवेल तालुक्यातील अजिवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने फळझाङांची रोपे लावून वृक्षारोपण अभियान राबवण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र अजिवलीचे वैद्यकीय अधिकारी संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी डॉ.पी.व्ही.पाटील, आरोग्य सहाय्यक संदेश गोवारी, आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्ग तसेच ग्रुप ग्रामपंचायत कोन गावाचे माजी उपसरपंच परशुराम माळी ,जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर अजिवली तफे॔ प्राचार्य श्री आर.के.पाटील सर,सहशिक्षिका व्हि.के.पाटील, तसेच जगदाळे सर व शालेय विद्यार्थी यांच्या कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळेस रायगड जिल्ह्य़ातील निसर्ग मित्र या संस्थेच्या वतीने प्रवीण देशपांडे, संजय कुमठेकर,व संजय वडे यांनी वृक्षारोपण करण्यासाठी अत्याआधुनिक यंत्रणा मार्फत खङ्ङे व पाच रोपटे उपलब्ध करून दिले.
तसेच सामाजिक वनीकरण महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रिती गाडगे यांच्या कडून रोपे पुरवण्यात आली.
संघाचे राज्य सचिव प्रवीण परमार, सहसचिव प्रशांत भोईर, प्रसिद्धी प्रमुख विजय म्हात्रे, रायगड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वारंसे ,जिल्हा कार्याध्यक्ष नितीन जाधव ,जिल्हा सचिव सतीश पेडणेकर, जिल्हा संघटक सचिन गायकवाड, जिल्हा सल्लागार प्रल्हाद पाटील, व अजिवलीचे विद्यमान सरपंच दीपक म्हात्रे वाजले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी रायगड आयोजक संघाकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल सगळ्यांचे आभार मानण्यात आले यानंतर झाडे लावा,झाडे जगवा अशी प्रतिज्ञा सगळ्यांनी घेतली.