पनवेल प्रतिनिधीश्री शिवराज्याभिषेक सोहळा पनवेल मध्ये संपन्न…
भारतीय पंचांगा नुसार आज जेष्ठ शुद्ध १३ म्हणजेच, १२ जून २०२२, रोजी शिवाजी महाराजांचा ३४९ वा राज्याभिषेक सोहळा पार पडला.
पनवेल :(प्रतिनिधी)
यंदाच्या राज्याभिषेक प्रसंग म्हणजे शिवराज शक ३४९ प्रारंभ झाला.
याच दिवशी शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या उभारणी नंतर अधिकृत राज्याची ग्वाव्ही दिली व स्वतः ला अभिषेक करून हिंदुपतपातशहा छत्रपती ही पदवी धारण केली.हाच तमाम भारतवर्षासाठी सुवर्णक्षण म्हणून भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला, याचा समग्र भारतीयांना अभिमान आहे.

परकीय फारसी भाषेतील शब्द मराठी भाषेत मिसळून मिश्र स्वरूपाची भाषा प्रचलित होती. ही बाब शिवाजी महाराजांच्या लक्षात होती, स्वतंत्र हिंदू राजा म्हणून मराठी भाषेतील मिसळलेले फारसी शब्द काढून टाकण्याचे आदेश तत्कालीन पंडित- अमात्य यांना देऊन, त्यांच्या करवी मराठी राज्यव्यवहार कोष निर्माण केला. ही बाब त्याकाळात सामान्य नव्हती.शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेक प्रसंगी स्वतःच्या नावे शिवराज संवत्सर चालू केला त्यामुळे हिंदुस्तानात पुन्हा एकदा हिंदू राजवट चालू करून भारतीयांना आपलेपणाची व स्वतःच्या स्वराज्याची जाणीव करून दिली हेच या प्रसंगाचे गमक होते.

तोच दिवस व त्याच प्रसंगाची आज भारतीय जनमानसाला आठवण करून देण्यासाठी व शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची स्मृती जागृत राहण्याच्या दृष्टीने श्री .शिव राज्याभिषेक सोहळा पनवेल मध्ये श्री. शिवसाह्यद्री संस्थेने आयोजित करून, मोठ्या उत्साहात सोहळा पार पडला.
या वेळी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अभिषेक सोहळ्यासाठी अनेक दिवस,आमंत्रणे, गाठीभेटी व सोहळ्याच्या ठिकाणी सजावट करण्यासाठी मेहनत घेण्यात आली होती.हा सोहळा पनवेल मधील अश्वारूढ शिवाजी महाराज पुतळा परिसरात करण्यात आला.यासाठी पनवेल महानगरपालिका ची रीतसर परवानगी व पनवेल शहर पोलीस यांच्या मार्गदर्शक सूचनेचे पालन करण्यात आले यांच्यामुळे कार्यक्रम निर्विघ्न पार पाडला.
कार्यक्रम सोहळ्याच्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या मुख्य अश्वारूढ स्मरकास फुलांची सजावट आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाईत मोठ्या दिमाखात करण्यात आली होती.
सकाळी ठीक ९.३० वाजता प्रत्यक्ष राज्याभिषेक सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. सकाळी चारुशीला घरात ,माजी उपमहापौर,व राजश्री वावेकर ,नगरसेविका पनवेल महानगरपालिका, यांच्या हस्ते श्री गणेश पूजन , आमदार बाळाराम पाटील व नगरसेवक .प्रथमेश दादा सोमण यांच्या हस्ते श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीस विधिवत मंत्रोच्चारारसहित अभिषेक करण्यात आला.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी सर्वाना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित केला.याच प्रसंगी पनवेल मधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
संस्थे तर्फे घेण्यात आलेल्या 2020 सालीच्या दुर्ग बांधणी स्पर्धा, निबंध स्पर्धा व संगीत पोवाडा गायन स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले .व शेवटी श्री शिव सहयाद्री संस्थेच्या ढोल ताशा ध्वज पथकाच्या महावादनाने छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला .या वेळी संस्थेच्या या सोहळ्यास महत्वपूर्ण मदत व इतर सहकार्य नगरसेवक गणेश कडू , नगरसेवक प्रथमेश सोमण, नगरसेवक समीर ठाकूर, आणि पनवेल शहर पोलीस यांनी केले. त्याबद्दल संस्थेने त्यांचे आभार व्यक्त केले .
हेमंत हातनोलकर, विशाल धायजे, अभिजित कोकरे,तेजस मोरे,संदेश म्हात्रे,प्राजक्ता बद्रिके,भाग्यश्री परदेशी, निशांत म्हात्रे, समीर जाधव,हनुमान वायभासे,नरेंद्र चाचड व सागर मुंढे यांनी सहभाग घेऊन सोहळ्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.