खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके ह्यांच्या नेतृत्वाखाली युवती पनवेल जिल्हा अध्यक्षा प्रज्ञा चौव्हान ,कार्याध्यक्ष पनवेल जिल्हा युवक शहबाज पटेल ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत खारघर शहर युवती अध्यक्षा रेणुका पगारे ह्यांच्या प्रयत्नातून खारघर शहरातील धोका दायक खड्ड्यांचा वार्षिक वाढ दिवस साजरा करत खड्ड्यांवर रांगोळी काढून व पुष्पगुच्छ देऊन ते खड्डे प्रशासनाच्या निर्देशनात आणण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले.

खारघर शहर हे आधुनिक स्मार्ट शहर म्हणून नियोजन आखलेले असले तरी कर दात्या कडून आर्थिक भुर्दंड लादत कुठल्याही प्रकारची सुरक्षित आधुनिक सेवा न देता दुर्लक्ष करत कर दात्यांचा पोषण न करता शोषण करत असल्याचे अनुभव काही वर्षा पासून खारघरकर सहन करत आहे त्यात पालिका प्रशासनाने सिडको कडून प्रशासकीय जवाबदारी स्वीकारण्याचा धाडस करत पनवेल महानगरपालिका कर दात्याना अतिरिक्त कर वाढ करून शोषण करण्याच्या मानसिकतेत असल्याचे चित्र दिसते.

आघाडी सरकारने संबंधित बाबतीत बैठक घेत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ह्यांच्या अध्यक्षतेखाली सिडकोच्या अधिकारी प्रशासकीय नियोजना वर अंकुश आणण्याचे महत्वपूर्ण निर्णया घेत असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे.

खड्या चे बर्थड्डे कार्यक्रम म्हणून जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील ह्यांच्या मार्गदर्शना नुसार सिडकोला लक्ष वेधत खारघर शहराध्यक्ष बळीराम नेटके ह्यांच्या उपस्थितीत पनवेल शहर जिल्हा युवती अध्यक्षा प्रज्ञा चव्हाण ,जिल्हा युवक कार्याध्यक्ष शेहबाझ पटेल, खारघर शहर युवती अध्यक्षा रेणुका पगारे ,पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष आर्यन यादव, रोजगार स्वयंरोजगार पनवेल शहर जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी, युवक सचिव पनवेल शहर जिल्हा चांद शेख ,पनवेल शहर खारघर शहर सरचिटणीस संतोष आसवे, मनीष कुळे, युवा कार्यकर्ता आसिफ पटेल तसेच राष्ट्रवादी महिला युवती उपाध्यक्ष शैला गवारी, प्रेरणा गावंड खारघर शहर युवती सरचिटणीस तसेच निधी मालविया, चांदणी कामणे,युवती कार्यकर्ते म्हणून शांता बाई , मीराजी ,शीतलजी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

 

खारघर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खड्याचे वार्षिक बर्थड्डे करत सिडकोचे लक्ष वेधले - Kokan Diary
Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.