◆ *परिचारिका दिनी परिचरिकांचा सत्कार म्हणजेच त्यांचा खरा सन्मान!: निशा परुळेकर*
◆ उत्तम कुमार आयोजित परिचारिका सन्मान सोहळा उत्साहात संपन्न!
प्रतिनिधी वसई :
भाजपा जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून आज वसई तालुक्यातील राज्य सरकरच्या अखत्यारीत येणाऱ्या आठ प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचरिकांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थित दिमाखात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेत्री निशा परुळेकर, भाजपा वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अजित असताना, वसई रोड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख अलमास खान, माजी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्य अतिथी निशा परुळेकर यांच्या हस्ते दीप प्रजवलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्व परिचरिकांना यावेळी प्रशस्त्रीपत्रक व भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
निशा परुळेकर यांनी यावेळी बोलताना, कोरोनाकाळात राज्यात आपल्या परिचरिकांनी जे काम केले आहे ते प्रशंसनीय असून पुरस्कार हे त्याचे निमित्त आहे.
महत्त्वाचे म्हणजे परिचारिका दिनी परिचरिकांचा सत्कार म्हणजेच त्यांचा खरा सन्मान! असे यावेळी त्या म्हणाल्या.
राजन नाईक यांनी यावेळी बोलताना, एक विशेष दिनी विशेष मान्यवरांचा सत्कार करण्याचा हा उपक्रम नक्कीच उल्लेखनिय आहे व उत्तमजी त्याचे महत्त्व ओळखून जो कार्यक्रम करतात त्याबद्दल त्यांना नक्कीच दाद दिली पाहिजे.
आयोजक उत्तम कुमार यांनी यावेळी बोलताना, कोरोनाकाळात 2020 पासून मी व्यक्तिशः सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांशी जोडलो गेलो, यावेळी त्यांना विविध प्रकारची मदत आम्ही पक्षाच्या माध्यमातून करत असू कोरोनाकाळात परिचरिकांनी आपली व आपल्या परिवाराची पर्वा न करता समाजासाठी जे काम केले ते आम्ही कधीच विसरू शकत नाही, असे यावेळी ते म्हणाले.
कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी भाजपा वसई रोड मंडळाचे सचिव रमेश पांडे, अशोक तलजीया, विनेश नायर यांनी विशेष मेहनत घेतली.